For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूकीचा वाढता ओघ

07:31 PM Jan 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूकीचा वाढता ओघ
Advertisement

2024 मध्ये 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेक भारतीयांचा मागच्या वर्षीही कल दिसून आला आहे. महत्त्वाचे म्हणजे 2024 मध्ये गोल्ड इटीएफमध्ये चारपट गुंतवणूक वाढली असल्याचे पाहायला मिळाले. 2024 चा शेवट चांगला झाला असून सोन्याच्या किमतीत नरमाई राहिल्याने इटीएफमध्ये सलग 9 व्या महिन्यात डिसेंबरमध्ये गुंतवणूक वाढलेली दिसली.

Advertisement

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडियाच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 18 गोल्ड इटीएफमध्ये डिसेंबर 2024 च्या दरम्यान 640.16 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. मागच्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2023 मधील गुंतवणूकीच्या तुलनेत मागच्या वर्षीची गुंतवणूक 625 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी समान अवधीत देशातील 15 गोल्ड इटीएफमध्ये 88.31 कोटी रुपये गुंतवले गेले होते. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमधील गुंतवणूक 49 टक्के घसरणीत दिसली. नोव्हेंबर 2024 मध्ये गोल्ड इटीएफमध्ये 1256.72 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली होती.

कॅलेंडर वर्षात 11 हजार कोटीची गुंतवणूक

एकंदर कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये गोल्ड इटीएफमध्ये 11,266.11 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये ही गुंतवणूक 2,923.81 कोटी रुपये इतकी होती. कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये 11 गोल्ड इटीएफमध्ये एकूण 458.79 कोटी रुपये गुंतवले गेले होते.

का वाढली गुंतवणूक

तज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात डिसेंबरमध्ये घट झाल्याने गुंतवणूकदारांनी गोल्ड इटीएफचा गुंतवणूकीसाठी पर्याय योग्य मानला होता. देशांतर्गत बाजारात डिसेंबर महिन्यात सोन्याची किंमत जवळपास 1 टक्के इतकी घसरली होती. याआधीच्या सततच्या 5 महिन्यात तेजी राखल्यानंतर नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या दरात 3 टक्के घसरण नेंदवली गेली.

Advertisement
Tags :

.