विदेशी भाषा शिकण्याकडे वाढता कल
कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
मातृभाषेसोबतच इंग्रजी आणि एखादी फॉरेन भाषा शिकणे काळाची गरज बनली आहे.अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग आधार ठरत आहे. गेल्या तीन वर्षात या विभागाकडे अॅडमीशनसाठी विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. रशियन, जर्मनी, पोतृगीज, फ्रेंज, जपानी या भाषा शिकण्यासाठी 200 विद्यार्थ्यांनी अॅडमिशन घेतले आहे. आतापर्यंत दहा हजाराच्या वर विद्यार्थ्यीं या विभागातुन विदेशी भाषा शिकुन देशात व परदेशात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत.
विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग विभागात रशियन, जर्मनी, जपानी, या भाषांचे तीन वर्षात शिक्षण दिले जाते. त्यामध्ये पहिल्या वर्षात प्रमाणपत्र दुसरया वर्षांत पदविका तिसरया वर्षांत उच्च पदविका असे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर प्रेंच आणि पोतृर्गीज भाषेचे एक वर्षाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. या विभागामध्ये विद्यार्थीं त्यांच्या मुख्य अभ्याक्रमासोबतच विदेशी भाषा शिकण्याकरता प्रवेश घेतात. या विभागात प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण ही साधरण पात्रता आहे. सध्या अभियांत्रिकी, पर्यटन, परदेशात शिक्षण घेण्यासाठी, हॉटेल व्यवसाय, तसेच मेट्रो शहरातील मोठ्या कंपनीमध्ये दुभाषी म्हणुन मनुष्य बळ लागत यासाठी बरेच विद्यार्थ्यी या विभागात प्रवेश घेतात. सध्या या विभागामध्ये तीन विद्यार्थीं पीएच.डी. करत आहेत.
- बहूभाषा शिकण्याचा असाही फायदा
अलीकडील काही संशोधनातुन हे स्पष्ट झाले आहे की बहुभाषिकतेमुळे अल्झायमर व डिमेन्शिया हे आजार होण्याची शक्यता एकभाषिक लोकांपेक्षा कमी होते. त्यामुळे बहुभाषिक होणे जसे करिअरच्या दुष्टीकोणातुन महत्वाचे आहे तसेच आरोग्याचाहीबाबतीत महत्वाचे ठरताना दिसत आहे.
- पारंपारिक अभ्यासक्रमापेक्षा जास्त पसंती
सध्या विदेशी भाषा विभागात 200 च्या आसपास विद्यार्थी रशियन, पोर्तृगीज, जर्मनी, जपानी, प्रेंच, शिकत आहेत. अलिकडे विद्यापीठामध्ये बाकीच्या अधिविभागात विद्यार्थी संख्या कमी होत असताना विदेशी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसुन येत आहे अशी माहिती अधिविभागामार्फत देण्यात आली.
- विदेशी भाषा विभागात तीन वर्षातील प्रवेशित संख्या
वर्ष प्रवेश
2022-23 189
2023-24 153
2024-25 196
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरसारख्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकुन आपल्या करिअरच्य नवनवीन संधी प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध कऊन दिली आहे. अनेक विद्यार्थीं आपल्या मुख्य प्रवाहातील शिक्षणाबरोबरच विदेशी भाषा शिकुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे, अतिशय समाधान देणारी बाब आहे.
डॉ. मेघा पानसरे विभागप्रमुख विदेशी भाषा विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल
पूर्वा नाडगौडा ही जपानी भाषेची विद्यार्थींनी जपानमध्ये फुजित्सु या जागतिक दर्जाच्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. आदित्य कुलकर्णी जपानमधील फार्मा फुड्स इंडरनॅशनल कंपनीत ओव्हरसीज बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणुन कार्यरत आहेत. वैभव रावण हे जर्मन भाषेचे विद्यार्थीं पुण्यातील मर्सिडीज बेन्झ इंडिया कंपनीत मॅनेजर म्हणुन कार्यरत आहेत.या विभागातील रशियन भाषेचे विद्यार्थीं ऊपाली कांबळे, सागर गोसावी, अभिषेक जोशी नाशिक मधील भारत सरकारच्या हिंदुस्थान एरोनॉटीक्स लि. या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तसेच वसीम सरकवास यांनी पर्यटन कंपनी सुरू करून ते विदेशी पाहुण्यांना कोल्हापुर भेटीत सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.