मातीमधील बॅक्टेरियामध्ये वाढतोय
अँटीबायोटिक प्रतिरोध
मानवी आरोग्यासाठी भविष्यातील सर्वात मोठे आव्हान
जागतिक तापमानात वाढ मातीत असलेल्या बॅक्टेरियामध्ये वेगाने अँटीबायोटिक रेजिस्टेंस जीनचा स्तर वाढत आहे. या जीनमुळे बॅक्टेरिया अशा औषधांबद्धल प्रतिरोधक ठरतात, जी त्यांना नष्ट करण्यासाठी वापरले जातात. हे केवळ आरोग्य संकट नव्हे तर हवामान बदलाचा धोकादायक आणि आतापर्यंतचा सर्वात उपेक्षित पैलू देखील आहे.
नेचर इकोलॉजी अँड इव्होल्युशन एन्व्हायरनमेंटल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित डरहॅम विद्यापीठाच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे. हवामान बदल आता केवळ वातावरण बदलत नसून मातीतील सुक्ष्मजीवांची संरचना देखील बदलत आहे. असे जीवाणू आता अँटीबायोटिक औषधांबद्दल प्रतिरोधी ठरत आहेत. वाढत्या तापमानासोबत बॅक्टेरिया अधिक सक्रीय, अनुकूलशील आणि कठिण प्रतिरोधक ठरत आहेत.
बॅक्टोरिया अशा जीनला सक्रीय करतात, जे त्यांना अँटीबायोटिक औषधांशी लढण्यास सक्षम करतात. ही एक घातक जैविक प्रक्रिया असून ती मानवी आरोग्यासाठी भविष्यातील सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. हा अत्यंत धोकादायक संकेत आहे, कारण मातीत बॅक्टेरियाचा एक विशाल भांडार आहे आणि हाच बॅक्टेरिया हळूहळू मानव आणि प्राण्यांमध्ये संक्रमण फैलावणाऱ्या रोगजनक जीवांपर्यंत पोहोचू शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.
23 टक्क्यांपर्यंत वाढणार धोका
सशोधकांनी मशीन लर्निंगद्वारे ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन असेच जारी राहिले तर 2100 सालापर्यंत मातीत अँटीबायोटिक प्रतिरोधक बॅक्टेरिया 23 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असा अनुमान व्यक्त केला आहे. हे परिवर्तन केवळ तापमान, पाऊस किंवा दुष्काळाचा विषय राहिलेला नाही. हे आता आजार कसे उद्भवतील, बदलतील आणि फैलावतील या दिशेने प्रभाव टाकत आहे. मातीतील बॅक्टेरियात वाढत असलेला अँटीबायोटिक प्रतिरोधक एक शांत संक्रमण क्रांति आहे. जे संक्रमण पूर्वी काही औषधांने दूर व्हायचे, ते आता असहाय्य करू शकते आणि हा धोका केवळ गरीब देशांना नव्हे तर पूर्ण जगासाठी आहे.
..तर उत्सर्जन घटणार
शहरांमध्ये पायी प्रवास आणि सायकल वापराला चालना देणारी धोरणे आणि पायाभूत विकासावर लक्ष देण्यात आल्यास कार्बन उत्सर्जनात 6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. याचबरोबर आरोग्य क्षेत्राला दरवर्षी 43,500 कोटी डॉलर्सचा आर्थिक लाभही मिळेल. युनिव्हर्सिटी ऑफ कैलिफोर्निया, लॉस एंजिलिस आणि गुगलच्या संयुक्त अध्ययनातून ही बाब समोर आली. पायी चालणे अन् सायकल प्रवास बहुआयामी तोडगा आहे. शहरांना भौगोलिक, सामाजिक अन् आर्थिक गरजांनुसार लोकांना सुरक्षित, सुलभ प्रवासाच पर्याय प्रदान करता येईल, अशा योजना आखाव्या लागतील.