For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सवाईवल ट्रेनिंगसाठी ब्रिटनमध्ये वाढती मागणी

06:09 AM Apr 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
सवाईवल ट्रेनिंगसाठी ब्रिटनमध्ये वाढती मागणी
Advertisement

25 वर्षांपर्यंत टिकणाऱ्या मांसाच्या बॉक्सची खरेदी : जंगलात जिवंत राहण्याचे घेत आहेत धडे

Advertisement

ब्रिटनच्या लोकांनी तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेवरून तयारी सुरू केली आहे. याचमुळे तेथे सर्वाइवल ट्रेनिंगची मागणी 75 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ब्रिटिश लोक तिसऱ्या महायुद्धाची शक्यता पाहता स्वत:ला तयार करत आहेत. लोक पुतीन यांच्या एक बटन पुश करण्याच्या संभाव्य सर्वनाशकारी विस्फोटापासून स्वत:ला वाचविण्यासाठी दीर्घकाळापर्यंत चालणारा पुरवठा आणि कठोर वातावरणासाठी कपडे जमा करत आहेत.

पाणी साफ करणाऱ्या उपकरणांची कमतरता निर्माण झाली आहे, ही उपकरणे पावसाच्या पाण्याला पिण्यासाठी सुरक्षित करतात आणि जर ताजा खाद्य पुरवठा संपुष्टात आल्यास फ्रीज-ड्राय करण्यात आलेले खाद्यपदार्थही संपुष्टात येतील. 25 वर्षांपर्यंत टिकणारे मांसाचे डबे, सैन्य श्वसनयंत्र आणि रेशन पॅक स्टोअरच्या रॅकवरून संपत असल्याची माहिती स्टोअर मालकांनी दिली आहे.

Advertisement

जंगलात जिवंत राहण्याच्या पद्धती शिकविणाऱ्या बुशक्राफ्ट कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या लाकंची संख्या मागील 2 वर्षांमध्ये 75 टक्क्यांनी वाढली आहे. ईस्ट एंग्लियामध्sय बॅक टू वाइल्डरनेस लर्निंग सेंटरचे संस्थापक रे चिन यांनी लोक वास्तवात मूलभूत कौशल्य म्हणजेच कुठल्याही उपकरणाशिवाय आणि लाकडांचा वापर करून आग कशी पेटवावी याषियी जाणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

सर्वाइवल गॅझेट

लोक अशा गॅझेटवर निर्भर राहू इच्छित नाहीत, जे तुटू शकतात किंवा खराब होऊ शकतात. रशियाकडून पाश्चिमात्यांच्या विरोधा युद्ध छेडले जाण्याच्या भीतीपोटी द बग आउट दुकानाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. तयारीचा अर्थ आत्मनिर्भरता, जेव्हा तुम्हाला ज्याची गरज असते ते अचानक मिळत नाही तेव्हा काय घडते? आता आम्ही सुविधांच्या अधीन झालो आहोत. परंतु पूर्वी असे नव्हते आणि भविष्यात देखील असे नसेल. 25 वर्षांपर्यंत टिकणाऱ्या फ्रीज-ड्राय चिकन आणि मासांच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली असल्याची माहिती माजी सैनिक लेह प्राइस यांनी दिली आहे.

प्रशिक्षणाकडे वाढता ओढा

मागील काही वर्षांमध्ये आमच्या कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 75 टक्क्यांनी वाढली आहे. पहिल्यांदा हा कोर्स सुरू केला असता तयारी करणारा ग्रूप छोटा होता आणि बहुतांश लोक आउटडोर सर्वाइवलिज्ममध्ये रुची बाळगायचे. प्रत्येक ब्रिटिश व्यक्तीकडे एक बग आउट बॅग असायला हवी, ज्यात जंगलात 72 तासांपर्यंत जिवंत राहण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी असाव्यात असे प्राइस यांनी म्हटले आहे.

उत्तर युरोपमध्ये वाढते प्रमाण

रशियासोबत वाढत्या तणावावरून अनेक लोक भय आणि चिंता व्यक्त करत आहेत. फेस  बुक समूह यूके प्रेपर्स अँड सवाईवलिस्ट्सचे जवळपास 22,500 सदस्य आहेत. उत्तर युरोपीय देशांनी आपत्कालीन योजना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वीडिश अधिकारी घरात बाटलीबंद पाणी, ऊर्जेने भरपूर अन्न, ब्लँकेट, पर्यायी हीटिंग आणि बॅटरीने चालणारा रेडिओ बाळगण्याचा सल्ला देत आहेत.

नॉर्वेत स्पेशल बंकर

आण्विक हल्ल्याच्या स्थितीत आयोडिनच्या गोळ्यांसह अनावश्यक औषधांचा साठा करावा असे नॉर्वेच्या प्रशासनाने लोकांना सुचविले आहे. तर जर्मन परिवारांना तळघर, गॅरेज किंवा स्टोअर रुमला बंकरच्या स्वरुपात वापरण्याचा आग्रह करण्यात आला आहे. पोलंडमध्ये बिल्डर्सना नव्या घरांमध्ये सुरक्षित आश्रयस्थळ तयार करावे लागणार आहेत.

Advertisement
Tags :

.