महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्राउंड्समन, क्युरेटर्सना बीसीसीआयकडून बक्षिसे जाहीर

06:54 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतामध्ये नुकत्याच झालेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी विविध 10 ठिकाणी खेळपट्ट्या आणि मैदान तयार करणाऱ्या ग्राउंडसमन आणि क्युरेटर्सना बीसीसीआयतर्फे रोख रकमेची बक्षीसे जाहीर करण्यात आली. सोमवारी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली.

Advertisement

चेन्नईमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना खेळविला गेला आणि कोलकाता संघाने हा सामना 8 गड्यांनी जिंकून तिसऱ्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेसाठी विविध 10 ठिकाणी क्यूरेटर्स आणि ग्राउंडसमन यांनी दर्जेदार खेळपट्ट्या आणि मैदान तयार केल्या. याबद्दल या 10 ठिकाणातील ग्राउंडसमनना आणि क्यूरेटर्सना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा शहा यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी तीन जादा ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सामन्यांच्या ठिकाणांमध्ये ग्राउंडसमन आणि क्यूरेटरला प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धेसाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, चंदीगड, हैदराबाद, बेंगळूर, लखनौ, अहमदाबाद आणि जयपूर ही सामन्यांची नेहमीची ठिकाणे आहेत. तर आयपीएल स्पर्धेसाठी गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाला ही जादा तीन ठिकाणे उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article