महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ड्रोनमधून टाकलेले ग्रेनेड,आयईडी बॉम्ब जप्त

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये ड्रोनमधून टाकण्यात आलेला शस्त्रास्त्रांचा बॉक्स पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या बॉक्समधून 9 ग्रेनेड, एक पिस्तूल, 38 गोळ्या आणि एक आयईडी बॉम्ब सापडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसराचा शोध सुरू केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीतून हा स्फोटक साठा पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीही या भागात असे प्रकार निदर्शनास आले आहेत. ड्रोनद्वारे पुरवठा होत असलेले अशाप्रकारचे साहित्य विविध ठिकाणी पुरवठा करण्यासाठी तस्करांचे एक मोठे जाळे कार्यरत आहे. सदर तस्करांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article