For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इफ्फीत यंदा चार दिग्गजांना अभिवादन

03:07 PM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
इफ्फीत यंदा चार दिग्गजांना अभिवादन
Advertisement

राज कपूर, तपन सिन्हा, ए. नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचा समावेश

Advertisement

पणजी : राज्यात येत्या दि. 20 पासून आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा भारतीय चित्रपट सृष्टीतील चार दिग्गज व्यक्तीमत्वांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. यंदाचा हा 55 वा चित्रपट महोत्सव आहे. राज कपूर, तपन सिन्हा, ए. नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांनी चित्रपट जगतासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या संपन्न वारशाचे स्मरण आदींचे प्रदर्शन, चर्चा, परिसंवाद आदी माध्यमातून सादरीकरण करण्यात येणार आहे. राज कपूर यांचा ‘आवारा’ हा चित्रपट डिजिटली पुनऊज्जीवित करण्यात आला आहे. या चित्रपटातील सामान्य माणसाच्या जीवनप्रवासातील जिव्हाळा, विनोद आणि सहानुभूती यांची अनुभूती महोत्सवात विशेष ठरणार आहे. त्यातूनच राज कपूर यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेले अनन्यसाधारण योगदान, सामाजिक विषयांची बारकाईने मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य आणि बांधिलकी यांना सार्थ अभिवादन ठरणार आहे.

अत्यंत क्लिष्ट विषय कथाकथनातून मांडण्याच्या तपन सिन्हा यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे दर्शन घडविणारा कालातीत चित्रपट म्हणजे ‘हार्मोनियम’. लक्षवेधी संकल्पना आणि सखोल कथन असलेला हा चित्रपट सिन्हा यांचा कलात्मक वारसा आणि चित्रपट साकारण्याच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. एएनआर यांनी पडद्यावर साकारलेला ‘देवदास’ समकालीन प्रेक्षकांना भारतीय सांस्कृतिक ओळख असलेल्या ‘देवदासू’ चित्रपटातून मिळणार आहे. चित्रपटाच्या इतिहासात एएनआर यांचा ठसा उमटवलेल्या ‘देवदासू’ चित्रपटाची पुनऊज्जीवित प्रत इफ्फीमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.‘हम दोनो’ या आणखी एका कालातीत चित्रपटाच्या पुनऊज्जीवित ऑडिओ-व्हिज्युअल प्रतीचे इफ्फीमध्ये प्रदर्शन करण्यात येणार आहे. महम्मद रफी यांनी अमर केलेली गीते असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे रफी यांच्या आवाजाची जादू सर्व पिढ्यांसाठी पुनऊज्जीवित होणार आहे.

Advertisement

चार व्यक्तीमत्वांच्या वारशाचाही होणार गौरव

इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात यंदा सदर चारही व्यक्तीमत्वांचे  जीवन आणि यशाचा गौरव करणारा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमाला चित्रपट जगतातील त्यांच्या प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाची जोड दिली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.