महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नगराध्यक्ष रितेश नाईक यांना असंख्य चाहत्यांकडून शुभेच्छा

12:18 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोंडा : फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांचा वाढदिवस काल रविवार 24 रोजी थाटात साजरा करण्यात आला. राजकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवर तसेच फोंड्यातील नागरिक व असंख्य चाहत्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. वाढदिनाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत ते खडपाबांध फोंडा येथील कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध होते. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त अॅङ नरेंद्र सावईकर, आमदार उल्हास तुयेंकर, माजी आमदार दामू नाईक यांच्यासह फोंडा व अन्य पालिकांचे नगरसेवक, सरपंच, पंचसदस्यांनी त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. काही मंत्री व आमदारांनी फोनवर संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय फोंड्यातील नागरिक तसेच असंख्य चाहत्यांनी सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. वाढदिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी शांतीनगर प्रभाग 1 मध्ये शांतीनगर व कुरतरकरनगरीला जोडणारा पदपूल व सुशोभीत केलेल्या पदपाथाचे तसेच सांताक्रूझ, तिस्क फोंडा येथे बालोद्यानाचे उद्घाटन केले. सायंकाळी कृषीमंत्री व त्यांचे वडील रवी नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी नगरसेवक आनंद नाईक, ऊपक देसाई, पीईएस शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रकाश बाळवे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article