जंगलांना वाचवू शकतो ‘ग्रीन चारकोल’
चाडमध्ये होतोय वापर
हवामान बदल आणि घरगुती वापरासाठी होत असलेल्या वृक्षांच्या शोषणामुळे आफ्रिकन देश चाडमधील 90 टक्क्यांहून अधिक वनक्षेत्र संपुष्टात आले आहे. चाडच्या एन जामेनामध्ये ग्रेस इंटरनॅशनलकडून ग्रीन कोळशाचे उत्पादन केले जात आहे. ग्रीन कोळशाच्या निर्मितीचा उद्देश उर्वरित जंगलाला तोडण्यापासू रोखणे आहे. पर्यायी इंधन आर्थिक स्वरुपात कमजोर चाडला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीपासून वाचविले जाऊ शकते असे मानले जात आहे. ग्रीन कोळसा उत्पादनाला यामुळे जोर देण्यात आला. हा कोळसा भांड्यांना काळं करत नाही आणि साधारण केळशापेक्षा अनेक पट अधिक वेळेपर्यंत पेटत राहतो. कर्मचारी रोपांच्या जळालेल्या अवशेषांची पावडर तयार करतात, मग त्याला अरबी गोंद आणि मातीसोबत मिसळतात, यामुळे तो पेटण्यास मदत होते. ग्रेस इंटरनॅशनलकडून हे काम केले जाते. 1.9 कोटी लोकसंख्या असलेला हा देश हवामान बदलामुळे वाळवंटात रुपांतरित होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आता तेथे पावले उचलण्यात येत आहेत. ग्रीन कोळसा हा पारंपरिक कोळशाप्रमाणेच दिसतो. पारंपरिक कोळशाप्रमाणेच जाळल्यावर सीओ2 उत्सर्जित करतो, परंतु तुलनेत हे प्रमाण कमी असते. ग्रीन कोळशाच्या निर्मितीचा उद्देश उर्वरित जंगलांचे रक्षण करणे आहे.
