For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फूड मॉडेलकडून निर्मित वाइनला मोठी मागणी

06:45 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
फूड मॉडेलकडून निर्मित वाइनला मोठी मागणी
Advertisement

पायांनी चिरडते द्राक्षं, हजारोंमध्ये करते विक्री

Advertisement

वाइन जर चांगली असेल तर ती पिणे अनेक जण पसंत करतात. याकरता ते मोठी रक्कम खर्च करायला तयार असतात. कुठल्याही वाइनची गुणवत्ता आणि किंमत ती कुठल्या प्रक्रियेद्वारे तयार करण्यात यावर निर्भर असते. तसेच द्राक्षांची कोणती गुणवत्ता त्यात वापरण्यात आली हे देखील महत्त्वाचे असते.  एक युवती स्वत:च्या पायांनी द्राक्षं चिरडून वाइन तयार करत आहे.

इंग्लंड येथे राहणाऱ्या मॉडेलने आपण पायांनी द्राक्षं चिरडून तयार केलेल्या वाईनला लोकांकडून मोठी मागणी असल्याचा दावा केला आहे. याचमुळे ती अनवाणी पायांनी द्राक्षं चिरडून त्याद्वारे वाईन तयार करते आणि मोठ्या रकमेला वाईनची विक्री करत आहे.

Advertisement

एमिली राई असे या मॉडेलचे नाव असून ती लंडनमध्ये राहते. ती स्वत:ला एक फूट मॉडेल संबोधिते. अलिकडेच तिने लंडनमध्ये रिनेगेड अर्बन वायनरीसोबत एक वाईन प्रोजेक्ट सुरू केला आहे. आपण सिंप वाईन करतो, ही वाईन तयार करता जुने तंत्रज्ञान वापरले जाते. माझ्या चाहत्यांना माझे पाय पसंत आहेत, अशास्थितीत माझ्या परफेक्ट पायांद्वारे चिरडून तयार करण्यात आलेली वाईन लोक आनंदाने 10,689 रुपयांमध्ये खरेदी करतात असे एमिलीचे सांगणे आहे.

मी स्वत:चा जीव पणाला लावून ही वाईन तयार करत आहे. द्राक्षं चिरडल्यावर तेथे निसरडी जागा तयार होते, अशास्थितीत खाली पडून जखमी होण्याची शक्यता असते. याकरता द्राक्ष खास लेबनॉनमधून मागविली जातात असे एमिली सांगते. अशाप्रकारच्या प्रोजेक्टद्वारे एमिली स्वत:च्या चाहत्यांना खूश करू इच्छिते. मी तयार केलेली वाईन करा असे आवाहन ती चाहत्यांना करत आहे.

Advertisement
Tags :

.