महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली-एनसीआरमध्ये ‘ग्रॅप-4’ प्रणाली लागू

06:10 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाढत्या प्रदूषणामुळे ‘सीएक्यूएम’चा निर्णय : आजपासून कडक निर्बंध : सर्व शाळा आता ‘ऑनलाईन

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. आता प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रॅप-4 प्रणाली लागू केली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून ग्रॅप-4 चे निर्बंध लागू होतील. दिल्लीतील अनेक भागात ‘एक्यूआय’ म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांक 450 च्या पुढे गेला आहे. प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (सीएक्यूएम) उपसमितीने ग्रॅप-4 लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ग्रॅप-4 लागू झाल्यानंतर सोमवारपासून दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक निर्बंध लागू होतील. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि सीएनजी-इलेक्ट्रिक ट्रक वगळता इतर सर्व ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने, सीएनजी आणि बीएस-6 डिझेल वाहनांव्यतिरिक्त दिल्लीबाहेरील इतर सर्व व्यावसायिक वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे.

प्राथमिक शाळांबरोबरच आता सहावीच्या वरच्या शाळाही बंद राहतील. राज्य सरकारे दिल्ली आणि एनसीआरमध्ये ऑनलाईन वर्ग चालवू शकतात. सरकारी आणि खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने चालू शकतात. त्याचवेळी कार्यालये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देऊ शकतात.

राज्य सरकारे इतर आपत्कालीन उपायांचा विचार करू शकतात. सरकार महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद करू शकतात. याशिवाय आपत्कालीन नसलेले व्यवसाय बंद केले जाऊ शकतात. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सम-विषम तत्त्वावर खासगी वाहने रस्त्यावर चालवण्याचा निर्णय घेऊ शकते. तसेच ग्रॅप फेज 3 प्रमाणेच बांधकाम आणि तोडफोडीवरही बंदी असणार आहे.

दिल्लीच्या काही भागात एक्यूआय 500 च्या जवळ

राजधानी दिल्लीत एक्यूआय 450 च्या पुढे गेला आहे. रविवारी दिवसभर आकाशात धुक्मयाची चादर होती. हवामान विभागाच्या तपासणीनुसार, दिल्लीत रात्री 8 वाजता एक्यूआय 462 ची नोंद झाली. काही ठिकाणी एक्यूआय 500 च्या जवळ पोहोचला होता. त्यानुसार दिल्लीच्या अशोक विहारमध्ये 490, बवानामध्ये 493, मुंडकामध्ये 490, वजीरपूरमध्ये 486, द्वारकामध्ये 483 आणि विमानतळावर 480 एक्मयूआय नोंदवण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article