शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान
15 व्या वित्त आयोगाकडून बेळगाव मनपाला 3.27 कोटी ऊपये
बेंगळूर : राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 15 व्या वित्त आयोगाने 2022-23 सालातील मूळ अनुदान वाटप (बेंगळूर महानगरपालिका वगळून) केले आहे. त्यानुसार बेळगाव महानगरपालिकेसाठी 3.27 कोटी रु. आणि कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी 17 लाख रुपये देण्यात आले आहेत.गोकाक नगरपालिकेसाठी 74.60 लाख रुपये आणि निपाणी नगरपालिकेसाठी 54.80 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याच्या अप्पर सचिवांनी यासंबंधीचा आदेश जारी करून माहिती दिली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यावर जमा होणारी ही रक्कम कर्मचाऱ्यांचे वेतन, विशिष्ट गरजांसाठी वापरता येणार नाही. केंद्र सरकारने संबंधित शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ही रक्कम राज्य सरकारच्या खात्यात जमा केलेल्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत वितरीत करण्याची अट घातली आहे. मुडलगी नगर पंचायतीसाठी 29 लाख रु., अथणी-47 लाख रु., बैलहोंगल-40.80 लाख रु., चिकोडी-39.80 लाख रु., रामदुर्ग-32.80 लाख रु., संकेश्वर-28.60 लाख रु., सौंदत्ती-34.40 लाख रु., हुक्केरी नगरपंचायतीसाठी 19.80 लाख रु. अनुदान देण्यात आले आहे. कुडची-10.80 लाख रु., सदलगा-24.80 लाख रु., घटप्रभा-25.80 लाख रु., हारुगेरी-54.20 लाख रु. उगार खुर्दसाठी 29.60 लाख रु. अनुदान देण्यात आले आहे.