‘कृष्णाकाठ’ तिसऱ्या टप्प्यातील कामाला अनुदान मंजूर
मंत्री शिवकुमार यांची माहिती
बेळगाव : कृष्णाकाठ योजनेसाठी सरकारने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीनुसार तसेच अनुदान उपलब्धतेवर योजनेसाठी अनुदान देऊन योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानपरिषदेत गुरुवारी दिली. आमदार पी. एच. पुजार यांच्या तारांकीत प्रश्नावर मंत्री शिवकुमार बोलत होते. कृष्णाकाठ योजनेचा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी 51,148.94 कोटी रुपये अनुदानाला (2014-15 मधील दरानुसार) प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत 18,307.33 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामामुळे 75,563 एकर जमीन व 25,660 इमारती पाण्याखाली जाणार असून आपद्ग्रस्तांना 3,734.53 कोटीची भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री शिवकुमार यांनी दिली.