नातवंडांच्या देखभालीसाठी आजी आकारते शुल्क
1 तासाकरता द्यावे लागतात 1 हजार रुपये
स्वत:च्या लहान नातवंडांना पाहून आजीआजोबांना होणारा आनंद काही औरच असतो. नातवंडांसाठी आजीआजोबा न झेपणारी दगदगही सहन करत असतात. स्वयंपाकापासून नातवंडांना स्नान घालण्यापर्यंत आजीआजोबा सर्वकाही करत असतात. परंतु सद्यकाळातील आजी अत्यंत वेगळ्या झाल्या आहेत. ब्रिटनमधील एक आजी स्वत:च्या नातवंडांची देखभाल करते आणि त्याच्या बदल्यात स्वत:च्या अपत्यांकडून पैसे घेते. ही आजी एक तासासाठी 1 हजार रुपयांचे शुल्क आकारते. ब्रिटनमध्ये राहणारी ही महिला सोशल मीडियावर वेल्शबटरगर्ल नावाने प्रसिद्ध आहे. ही महिला स्वत:च्या नातवंडांच्या देखभालीसाठी स्वत:च्या अपत्यांकडून पैसे घेते.
ती 10 युरो प्रतितासाने ही देखभाल करते. रात्रभराच्या देखभालीसाठी हे शुल्क वाढून 100 युरो (सुमारे 10,500 रुपये) करते. आजीचे वर्तन अनेक लोकांना पसंत पडलेले नाही. या आजीला लोक स्वार्थी ठरवत आहेत. नातवंडांच्या देखभालीसाठी पैसे आकारणे चुकीचे वाटत नाही. मुले सकाळी सकाळी त्रास देण्यास सुरुवात करतात, यामुळे मला कुठल्याही कारणाशिवाय लवकर उठणे भाग पडते. मी वयाच्या 40 व्या वर्षी आजी होण्याची तयारी केली नव्हती. मी या कामाऐवजी नोकरी करणे अधिक पसंत करेन. जर मी माझ्या नातवंडांची देखभाल करत असेन तर त्याचे फळ मिळायला हवे, असे 4 मुलांची आई असलेली ही महिला सांगते.