कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजीची सायकलने जगभ्रमंती

06:46 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

12 देशांचा एकट्यानेच केला प्रवास

Advertisement

जगातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या देशांचा प्रवास करण्याची इच्छा बाळगून असतो. परंतु इच्छा असूनही अनेकांना ती पूर्ण करता येत नाही. पण काही लोकांना प्रवास करण्याचा छंद असतो, यामुळे ते खर्चाची चिंता करत बसत नाहीत. चीनमधील एक आजी याच विचाराने जगभ्रमंतीसाठी बाहेर पडली आहे. ती सायकलने वेगवेगळ्या देशांचा प्रवास करत आहे.

Advertisement

चीनच्या जेंगजाऊ येथील रहिवासी ली डॉन्गजू 66 वर्षांची असून ती आजी झाली आहे, परंतु तिला जगभ्रमंतीच्या ध्यासाने पछाडले आहे. यामुळे तिने 100 देशांचा प्रवास करण्याचा निर्धार केला आहे. तिने आतापर्यंत 12 देशांचा एकट्यानेच सायकलद्वारे प्रवास केला आहे. ती दक्षिणपूर्व आशिया, युरोप आणि ओशेनियात, कंबोडिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन आली आहे.

100 देशांचा प्रवास करण्याची माझी इच्छा आहे. माझा प्रवास सोपा नसतो. मला केवळ चिनी भाषा अवगत आहे, याचमुळे याचा अनुवाद करणाऱ्या अॅपचा वापर करते, याच्या मदतीने सर्वसामान्य लोकांशी संवाद साधता येतो. माझे बजेट कमी आहे, यामुळे मी अनेकदा पार्कमध्ये तंबू ठोकते, गॅस स्टेशनवर थांबते, अनेकदा मी दफनभूमीतही राहिले आहे. याचबरोबर लोकांच्या घरातही पाहुणचार घेतला असल्याचे त्या सांगतात.

कमी पैशांमध्ये करतेय प्रवास

ली एक निवृत्त कर्मचारी असून त्या चीनच्या एका सिल्वर ट्रॅव्हलर ग्रूपशी संबंधित आहेत. 2013 मध्ये घटस्फोट झाल्यावर नैराश्याला दूर करण्यासाठी त्यांनी हा प्रवास सुरू केला होता. सायकलिंगपूर्वी त्या इतरांवर बऱ्याचअंशी निर्भर राहायच्या. परंतु आता त्या स्वत:ला मुक्त अन् सशक्त मानतात. त्यांच्या मुलाने त्यांच्यासाठी एक फोल्डेबल माउंटेन बाइक खरेदी केली होती. सर्वप्रथम ली याच्या मदतीने तिबेटपर्यंत जाऊ इच्छित होत्या. परंतु तेव्हा त्यांच्याकडे केवळ 1978 रुपये होते. 2002 मध्ये त्यांची नोकरी सुटली होती, त्यापासून त्या महिन्याच्या 35 हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये उदरनिर्वाह करतात. अधिक पैसे वाचविण्यासाठी त्या लोकांच्या घरात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. यातून त्यांनी पैसे जमविले आणि दोन सहकारी सायकलिस्टांसोबत दक्षिणपूर्व आशियाचा प्रवास केला. आता त्या कजाकिस्तानातून संयुक्त अरब अमिरातीसाठी प्रवास करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article