येथे भाड्याने मिळते आजी
एका तासासाठी द्यावे लागतात 1900 रुपये
कधीकधी आमच्यासमोर अशी समस्या किंवा गोंधळाची स्थिती निर्माण होते, ज्याबद्दल वृद्ध किंवा अनुभवी व्यक्तीशी बोलण्याची नितांत गरज भासते. जपानमध्ये मोठ्या संख्येत एकटे राहणाऱ्या लोकांच्या या समस्येचे निदानही एक कंपनी करत आहे. ही कंपनी ‘ओके ग्रँडमा’ नावाने सेवा उपलब्ध करविते. क्लाएंट सर्व्हिसेस नावाची जपानी कंपनी सफाई आणि आवास सेवांपासून मुलांची देखभाल आणि पाळीव प्राण्यांची देखभाल यासारख्या अनेक प्रकारच्या सुविधा पुरविते.
या कंपनीच्या अनोख्या सेवाच लोकांना तिच्याविषयी बोलण्यास प्रेरित करतात. हे लोक स्वत:च्या वतीने कुणालाही कुठल्याही कार्यक्रमात सामील करवू शकतात. तसेच संबंधिताच्या वतीने ते माफीही मागू शकतात. तर कंपनीच्या सर्वात लोकप्रिय सेवांमध्ये ’ओके ग्रँडमा’ सेवा आहे. यात कुठल्याही 60-94 वयोगटातील महिलेला किंवा वरिष्ठ नागरिकाला 3300 येन म्हणजेच 1900 रुपये प्रतितासाच्या शुल्कावर भाड्याने मिळविण्याची अनुमती असते.
ओके ग्रँडमा उर्फ ओके ओप्पा-चान, क्लाएंट सर्व्हिसेसच्या स्थापनेच्या दोन वर्षानी 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. आजही कंपनीच्या सर्वात लोकप्रिय सेवांपैकी ही एक आहे. क्लाएंट सर्व्हिसेसमध्ये कार्यरत 100 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांकडे समृद्ध जीवनाचे अनुभव आहेत.
कमी वयाच्या लोकांना मार्गदर्शन
आपल्याकडे समाजासाठी खूप काही योगदान देण्याची क्षमता आहे. यात पारंपरिक कौशल्य, पाककला, गरजूला मदत करणे सामील असल्याचे या वृद्धांचे मानणे आहे. वयाचे हेच वैशिष्ट्या आहे की क्षुल्लक गोष्टींवरून विचलित होऊ नका, असे ओके ग्रँडमाच्या अधिकृत पेजवर लिहिले गेले आहे.
प्रत्येक समस्येवर तोडगा
भाडेतत्वावर मिळणारी ही ग्रँडमा गरजू लोकांना त्यांचे घरगुती काम, मुलांची देखभाल, शेजारी आणि नातेवाईकांसोबत संबंध कायम राखण्यासाठी आवश्यक संवाद कौशल्य, चांगल्या-वाईट स्थितींना झेलण्याची क्षमता, उत्साहपूर्ण वर्तन इत्यादी गोष्टी शिकविते. स्वत:च्या गरजेनुसार आजी निवडता येत असल्याने ग्राहकांना केवळ स्वत:च्या गरजा कंपनीला सांगाव्या लागतात. मग क्लायंट सर्व्हिसेस योग्य उमेदवार उपलब्ध करविते. काही जपानी आजी पारंपरिक व्यंजनांमध्ये तरबेज असतात. तर काही घराची सफाई आणि मुलांच्या देखभालीत उत्तम असतात. या आजींकडून जीवनासाठी प्रभावी सल्ले मिळतात.