For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूरात गुरुवारी भव्य मैदान अव्वल मल्लांच्या निकाली कुस्त्या

09:56 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूरात गुरुवारी भव्य मैदान अव्वल मल्लांच्या निकाली कुस्त्या
Advertisement

पुष्पेंदर अलमगीर पंजाब - विनीतकुमार मारा हरियाणा यांच्यात प्रमुख लढत

Advertisement

बेळगाव : येळ्ळूर येथे श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त अशा संयुक्त यात्रेनिमित्त भव्य लोकमान्य केसरीसाठी जंगी राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदानाचे आयोजन गुरुवार दि. 2 मे रोजी येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेंची तयारी अंतिम टप्पात आली आहे. यावर्षी 50 हजाराहुन अधिक कुस्ती शौकिनांची बसण्याची सोय करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती हिंद केसरी, भारत केसरी इंडियन नेव्हीचा मल्ल पुष्पेंदर अलमगीर पंजाब व भारत केसरी विनीतकुमार मारा हरियाणा यांच्या होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी सत्रसाल आखाड्याचा पृथ्वीराज मोहोळ दिल्ली व भारत केसरी नरेंद्र आखाडा हरियाणाचा भोला बारण यांच्यात तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भरत मदने पुणे व नरेंद्र आखाडा हरियाणाचा रोहित कटारिया यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती जितू आखाडा हरियाणाचा रोहिल चौधरी व महाराष्ट्र चॅम्पियन हंडे पाटील ता. सांगलीचा सुबोध पाटील यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती भरत केसरी रोबिन हु•ा रोहतक व डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात, सहाव्या क्रमांची कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी संगमेश बिरादार व मोतीबागचा उदयराज पाटील टायसन यांच्यात, सातव्या क्रमांकाची कुस्ती दीपक दिल्ली व कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोणी, आठव्या क्रमांकाची कुस्ती शिवा द•ाr दर्गा व देवनरेला दिल्ली, नवव्या क्रमांकाची करण दोहा दिल्ली व कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती संजू इंगळगी दर्गा व कामेश कंग्राळी यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठ्या 70 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. आकर्षक कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती विजेता सौरभ पाटील राशिवडे व कर्नाटक किशोर रोहन घेवडी तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन रोहित पाटील व सांगलीचा उदयराज सासणे, कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील व हनुमंत गंद्दीगवाड, चौथ्या क्रमांकाची कुस्ती विनायक पाटील येळ्ळूर व ओमकार पाटील सांगली, पाचव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार खत्रे सांगली व समीर रणकुंडये, सहाव्या क्रमांकाची कुस्ती निखील माने सांगली व जोड पाहून होणार आहे. कुस्त्या वेळेत होणार असुन सर्व मल्लानी वेळेत उपस्थित राहुन मैदान यश्स्वी करावे असे आव्हाहन करण्यात आले आहे. तरी याची दक्षता सर्वानी घ्यावी अशी माहिती येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भोला पाखरे व कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.