कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावमध्ये भव्य शिवकालिन शस्त्रप्रदर्शन

12:05 PM Feb 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचा उपक्रम : उद्यापासून प्रारंभ

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणा पाहण्याची संधी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने उपलब्ध करून दिली आहे. दि. 11 ते 14 फेब्रुवारीदरम्यान भव्य शिवकालिन शस्त्रप्रदर्शन आणि मराठा आरमार तसेच शिवकालिन रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शन भरविले जाणार आहे. बेळगाव परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मोफत पाहता येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे इव्हेंट चेअरमन अशोक नाईक यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शालेय विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरत चालले आहेत. हा इतिहास शस्त्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने शस्त्रप्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनामध्ये मावळ्यांनी प्रत्यक्ष लढाईवेळी वापरलेली शस्त्रे मांडण्यात येणार आहेत. यामुळे शिवरायांचा गनिमी कावा, त्यांची दूरदृष्टी, विचार जवळून पाहता येणार आहेत. याबरोबरच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचे सरदार व मावळे यांच्या जीवनावर आधारित भव्य रांगोळी प्रदर्शनदेखील होणार आहे. 36 ते 40 तासांचा कालावधी रांगोळी साकारण्यासाठी कलाकारांना लागणार आहे. नाशिक येथील साई आर्ट्सचे 15 स्पर्धक रांगोळी रेखाटणार आहेत.

11 रोजी सकाळी 10 वाजता गोवावेस येथील स्वीमिंग पूल येथून मिरवणूक काढली जाणार आहे. एक हजारहून अधिक विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होतील. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी तसेच विक्रमसिंह मोहिते सरदार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. या बरोबरच दररोज विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, पीव्हीजी ग्रुप, पीएनजी, बिर्ला स्कूल, चैतन्य इन्स्टिट्यूट, स्मार्ट इन्व्हेस्टमेंट, सचिन सांबरेकर, सचिन हंगिरगेकर, शिरीष गोगटे यांच्या सहकायून हा कार्यक्रम होणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष निलेश पाटील, सेक्रेटरी भूषण मोहिरे, गोविंद मिसाळे, डॉ. मनोज सुतार, प्रणव पित्रे यासह इतर उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्या म्हणजे छत्रपतींच्या काळात सरदार व मावळ्यांनी वापरलेली शस्त्रे बेळगावच्या नागरिकांना पाहता येणार आहेत. सरदार व मावळ्यांच्या वंशजांनी ही शस्त्रे जतन करून ठेवली आहेत. हत्तीची सेंड ज्या तलवारीने उडविली ती येसाजी कंक यांची तलवार तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरे यांना दिलेली कवड्यांची माळ बेळगावकर शिवप्रेमींना पाहता येणार आहे. त्याचबरोबर येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, तानाजी मालुसरे यांचे वंशज ओमकारराजे व शीतल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे त्याचबरोबर विक्रमसिंह मोहितेयशराज घोरपडे, मेघराज शिंदे यांसह इतर उपस्थित राहतील.

 

असे होणार कार्यक्रम

मंगळवार दि. 11 : वेळ- सायं. 4 वा. वेशभूषा स्पर्धा.

बुधवार दि. 12 : वेळ- सायं. 4 वा. लघुनाट्या स्पर्धा

गुरुवार दि. 13 : वेळ- सायं. 4 वा. शिवकालिन देखावा स्पर्धा

शुक्रवार दि. 14 : वेळ- सायं. 4 वा. पारितोषिक वितरण व सायं. 5 वा. व्याख्याते अमर अडके यांचे व्याख्यान

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article