लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ चे थाटात उद्धघाटन
लोकमान्य व तरुण भारत मर्यादित लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ च्या १५ व्या आवृत्तीचा शुभारंभ युनियन जिमखानाच्या मैदानावरआज पासून झाला . २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सामन्यामध्ये बेळगाव,सावंतवाडी,गोवा,रत्नागिरी,सांगली,कोल्हापूर,मुंबई ,पुणे,नाशिक येथील संघ सहभागी झाले आहेत.
याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संचालक विठ्ठल प्रभू, गजनान धामणेकर,सुबोध गावडे,को - ऑर्डिनेटर विनायक जाधव,पीआरओ राजू नाईक , सतीश गोडसे, उमेश कासेकर, भरम कोळी, कार्पोरेट संघाचे कॅप्टन अमर खणगावकर, मॅनेजमेंट संघाचे कॅप्टन गणेश कंग्राळकर यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात सोडून उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी लोकमान्यचे एच.आर मॅनेजर जयेश पाटील, सीएसओ कर्नल दीपक गुरंग,असिस्टंट रिजनल मॅनेजर सी.आर.पाटील यांच्यासह विविध संघांचे खेळाडू उपस्थित होते. आज झालेल्या सामन्यात सावंतवाडी विरुद्ध बेळगाव यांच्या झालेल्या सामन्यात सावंतवाडी संघाने विजय मिळवला, मुंबई विरुद्ध तरुण भारत गोवा यांच्या झालेल्या सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवला. मडगाव विरुद्ध मॅनेजमेंट संघ यांच्या झालेल्या सामन्यात मॅनेजमेंट संघाने विजय मिळवला. रत्नागिरी व सांगली विरुद्ध म्हापसा यांच्या झालेल्या सामन्यात म्हापसा संघाने विजय मिळवला. कॉर्पोरेट विरुद्ध बेळगाव रिजनल ऑफिस यांच्या झालेल्या सामन्यात बेळगाव रिजनल ऑफिस संघाने विजय मिळवला. कोल्हापूर विरुद्ध तरुण भारत गोवा यांच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने विजय मिळवला.