महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईलचे थाटात उद्घाटन

11:27 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साड्यांसह सुटींग-शर्टींग उपलब्ध : कचेरी गल्ली शहापूर येथे भव्य दालन : पहिल्याच दिवशी ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्राचे महावस्त्र दालन व लग्न बस्त्याचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईल प्रा. लि. या दालनाचा रविवारी बेळगावच्या शहापूर येथील कचेरी गल्ली येथे थाटात शुभारंभ करण्यात आला. होलसेल दरात रिटेल विक्री केली जात असल्याने महाराष्ट्रातील 25 शहरांमध्ये 50 हून अधिक शाखा असणारे साड्या तसेच इतर कपड्याचे भव्य शोरुम आता बेळगावमध्ये सुरू झाले आहे. शोरुमचे उद्घाटन द्वारकादासजी माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कन्हय्यालाल चिंडक, गोपाल जाजू, राजगोपाल चिंडक, सुरेश चिंडक, संजय चिंडक, प्रशांत चिंडक, पंकज चिंडक, बाबुलाल जाखड यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन सोहळा पार पडला.

Advertisement

थेट मिलपासून ग्राहकांपर्यंत साड्या पोहोचविल्या जात असल्याने द्वारकादास शामकुमार दालनामध्ये माफक दरात साड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शोरुममध्ये सुरत, बेंगळूर, जयपूर, मऊ, बनारस, कोलकाता, मुंबई, मदुराई, मालेगाव, कोईमतूर, दिंडीगल अशा भारतातील स्वनिर्मित साड्यांच्या मोहक डिझाईन उपलब्ध आहेत. कांजीवरम, पेशवाई डिझाईनर साडी, सिल्क साडी, पैठणी, साऊथ सिल्क, कॅटलॉकमधील साड्यांसह ड्रेस मटेरियल, सुटींग, शर्टींगदेखील उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर, पंढरपूर, सांगली या सारख्या मोठ्या शहरांनंतर आता द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईल बेळगावमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

खरेदीवर खास ऑफर

खरेदीवर द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईलकडून आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. रुपये 3 हजारपेक्षा अधिक खरेदीवर 799 रुपयांची बॉकेट साडी मोफत दिली जाणार आहे. तर 5 हजारपेक्षा अधिक खरेदीवर 1 हजार 199 रुपयांची टिश्यू सिल्क साडी मोफत दिली जाणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ही ऑफर असणार असून महिलावर्गाने या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article