चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या बेळगाव सुवर्ण दालनाचा 9 रोजी भव्य शुभारंभ
उद्घाटनानिमित्त आकर्षक बक्षिसे मिळविण्याची सुवर्णसंधी : अनेक योजनांचा लाभ : परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता पंचसूत्रीवर विश्वास
बेळगाव : कर्नाटक राज्याची दुसरी राजधानी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या व वेणुग्राम अर्थात बांबूचे गाव या नावाने सुपरिचीत असलेल्या, पर्यटन, अर्थ, उद्योग, सहकार, ऐतिहासिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर व कर्नाटक राज्यातील महत्त्वाचे शहर असणाऱ्या, 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता या पंचसूत्रीवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या बेळगाव सुवर्ण दालनाचा भव्य शुभारंभ बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अभय पाटील, आमदार राजू शेठ, माजी आमदार संजय पाटील, के.एल.ई. ग्रुपचे चेअरमन प्रभाकर कोरे, अग्रगण्य उद्योजक डॉ. रमेश आणि सावित्री दोड्डण्णावर आणि चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल जिनदत्त शहा, संगीता अतुल शहा यांच्या शुभ हस्ते व सिद्धार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर, खडेबाजार, बेळगाव येथे संपन्न होत आहे.
या निमित्ताने चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाववासियांना केले आहे. उद्घाटनानिमित्त 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत रु. 15,000 पासून पुढील दागिने खरेदीवर अनेक बक्षिसे ग्राहकांना मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये 6 लॅपटॉप, 3 स्कूटर, 6 मोबाईल तसेच रु. 3000 पासून योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहेत. कृषी, पर्यटन आणि उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या, आधुनिकता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक वारसा लाभलेल्या बेळगाव शहरात सुरू होणारी चंदुकाका सराफ ज्वेल्सची ही पंधरावी शाखा आहे. शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी, सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांच्या भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्यो असणारी ही पेढी ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल करत आहे.
समृद्ध आणि सुजलाम-सुफलाम बेळगाव शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून आता बेळगावचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी आम्ही येत आहोत. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून बेळगाववासीयांना साजश्रृंगारासाठी आता उत्तमोत्तम आणि अभिनव पर्याय मिळणार आहेत. बेळगावकरांचे व आमचे अतूट नाते निर्माण होईल, असा विश्वास चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुलकुमार शहा यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त बेळगाववासीयांनी घ्यावा, असे आवाहन संचालक सिद्धार्थ शहा यांनी केले आहे.