डी.के.हेरेकर ज्वेलर्सच्या बेळगाव शाखेचे थाटात उद्घाटन
संयुक्त महाराष्ट्र चौकात ग्राहकांच्या सेवेत दाखल
बेळगाव : ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शहापूर येथील डी. के. हेरेकर ज्वेलर्सची नवीन शाखा संयुक्त महाराष्ट्र चौक, बेळगाव येथे सुरू केली आहे. सोमवारी मोठ्या थाटात याचे उद्घाटन झाले. कोल्हापूर येथील मधुकर चोडणकर यांच्या हस्ते ज्वेलरी शॉपचे उद्घाटन झाले. सोने तसेच चांदीचे विविध प्रकारातील दागिने या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. कारागिरीतून सुरुवात केलेल्या डी. के. हेरेकर ज्वेलर्सने सुरुवातीपासूनच ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दागिने दिले आहेत. तेली-पाटील गल्ली, शहापूर येथे सुरू असलेल्या शॉपमध्ये होलसेल तसेच रिटेल सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत होती.
बेळगावसह गोवा, बैलहोंगल, खानापूर, चंदगड, कोल्हापूर भागातून ग्राहक खरेदीसाठी येतात. या ग्राहकांकडून बेळगाव शहरात शाखा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार खडेबाजार संयुक्त महाराष्ट्र चौक येथे डी. के. हेरेकर ज्वेलर्सची दुसरी शाखा सुरू करण्यात आल्याची माहिती अतुल हेरेकर यांनी दिली. दिलीप हेरेकर यांनी स्वागत केले. आतापर्यंत ग्राहकांनी ज्या प्रकारे विश्वास ठेवला तसाच विश्वास यापुढेही ठेवण्याची विनंती केली. यावेळी ओमकार हेरेकर, संतोष चोडणकर, रामनाथ चोडणकर, अनिता हेरेकर, धनश्री हेरेकर, श्रेया हेरेकर, अन्वी हेरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर खास ऑफर
नवीन ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स डी. के. हेरेकर ज्वेलर्सने ठेवल्या आहेत. सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर चांदीचे दागिने वजनानुसार मोफत दिले जाणार आहेत. रुपये दहा हजाराच्या खरेदीवरही आकर्षक ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर 30 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे.