महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एस्पायरिंग लीडर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे थाटात उद्घाटन

11:34 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कठीण परिस्थितीत मेहनत आणि जिद्द कायम ठेवून तरुणांनी स्वत:ला झोकून द्यावे, तरुणांना नेवी, लष्कर आणि एअरफोर्समध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. शिस्त आणि प्रेरणा अंगी बाळगून त्या दिशेने प्रयत्न करावेत, असे उद्गार मेजर आर. एस. गुरय्या यांनी काढले. एस्पायरिंग लीडर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे शुक्रवारी गोंधळी गल्ली येथील पार्वती कॉम्प्लेक्समध्ये थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर इन्स्टिट्यूटचे संचालक कर्नल किरपाल सिंग, विनोद बामणे, हरदीप कौर, ज्योती बामणे आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर बोलताना मेजर गुरय्या म्हणाले, अलीकडे हवाई, नाविक आणि लष्कर या तिन्ही दलांमध्ये सहभागी होण्याची तरुणाईची इच्छा वाढत आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांचा प्रवेश सुकर होणार आहे. या हेतूने हे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणार्थींनी शिस्त आणि वेळ यांचे बंधन पाळून शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. यावेळी कर्नल किरपाल सिंग यांनी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. याप्रसंगी तरुण, तरुणी, पालक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article