दिल्लीमध्ये छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे! उदयनराजे यांची अमित शहा यांच्याकडे मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीमध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणेत यावे, महापुरुषांची बदनामी करणा-यांस जबर शासन होणेसाठी सुसंगत कडक कायदा करावा. पर्यटन मंत्रालयामार्फत शिवस्वराज्य सर्किट विकसित करावे, या प्रमुख मागण्यांसह, आपल्याला फायदेशीर ठरेल अश्या पध्दतीने ऐतिहासिक घटना रंगवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास केंद्र, राज्य शासनामार्फत प्रसिध्द करण्यात यावा. ऐतिहासिक चित्रफित किंवा चित्रपटांचे सेन्सॉर बोर्डाने परवानगी देताना इतिहासतज्ञांच्या कमिटीची प्रथम मान्यता घेण्याची बंधन घालावे, अशा मागण्या सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटून केली.
तसेच ऐतिहासिक कालखंडातील प्रसंगांचे मुल्य अधिकृत ठरवण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमुन पुरातत्व विभागाच्या वतीने प्रसिध्दी झालेले अप्रसिध्द राहीलेले दस्तावेज, चित्रे,शस्त्रागाराची माहिती इत्यादी विषयांवर नव्याने अभ्यास करून अधिकृत इतिहास शासनाने प्रसिध्द करावा, तसेच ज्या विदेशातील सरकारकडे अशे दस्तावेज सापडतील ते भारतामध्ये आणण्यसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्ये केली गेली जात असून त्यातून समाजिक तेढ निर्माण होत आहे. कायदेतज्ञांची मदत घेऊन अश्या घटना घडु नयेत व महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्यास कडक शिक्षेची तरतुद असलेला कायदा संसदेत पारीत करावा अशीही मागणी त्यांनी केली.
केंद्रीय पर्यटन मंत्र्याची भेट घेऊन स्वदेश योजने अंतर्गत बुदध सर्किट, रामायण सर्किट यासांरखी सर्किट विकसित केली आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शिवस्वराज्य सर्किट विकसित करण्याच यावं अशीही मागणी त्यांनी केली.