कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कन्नड सक्तीविरोधात 11 ऑगस्टला भव्य महामोर्चा

12:36 PM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यवर्ती म. ए समितीचा निर्णय : एकी दाखवून मराठी अस्मितेसाठी सहभागी होण्याचे आवाहन  

Advertisement

बेळगाव : कर्नाटक सरकारकडून कन्नड सक्तीचा बडगा अधिकच तीव्र केला जात आहे. केवळ सरकारी कार्यालय नाही तर आता गणेशोत्सव मंडळांनाही कन्नडसक्ती केली जात आहे. त्यामुळे आता ही मराठी भाषिकांसाठी आर या पारची लढाई असून 11 ऑगस्ट रोजी भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषिकांनी आपली एकी दाखवून मराठी अस्मितेसाठी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक रविवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या कन्नड सक्तीचा निषेध करण्यात आला. बेळगाव महानगरपालिकेतील मराठी फलक हटविण्यात आले. त्यानंतर गणेशोत्सव मंडळांनाही कन्नडची सक्ती करत फलक हटविण्यात आला. या विरोधात मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात घटक समित्यांच्या बैठका लवकरच घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या नगरसेवकांचे कौतुक 

महानगरपालिकेमध्ये मराठी भाषेवर अन्याय होत असताना मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या नगरसेवकांचे मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने कौतुक करत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मराठीसाठी काम करणाऱ्या या नगरसेवकांच्या पाठीशी समिती कायम कार्यरत राहील, असे सांगण्यात आले. संसद रत्न मिळविलेल्या अरविंद सावंत, सुप्रिया सुळे या खासदारांचेही अभिनंदन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. बैठकीमध्ये मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मनोहर हुंदरे, वसंत नावलकर, रणजीत पाटील, बाळासाहेब शेलार, पीयूष हावळ, लक्ष्मण पाटील, गोपाळ देसाई, एम. जी. पाटील, जयराम देसाई यांनी मते मांडली. यावेळी मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.

मग महाजन अहवाल सर्वोच्च न्यायालयात मांडाच 

कर्नाटकचे समन्वय मंत्री एच. के.पाटील यांनी शनिवारी बेळगावला भेट देऊन सीमाप्रश्नाबाबत कर्नाटकसाठी महाजन अहवाल अंतिम असल्याचे तुणतुणे पुन्हा एकदा वाजवले. महाजन अहवाल इतकाच श्रेष्ठ वाटत असेल तर तो सर्वोच्च न्यायालयात मांडाच, असे आव्हान मध्यवर्ती म. ए. समितीने मंत्री एच. के. पाटील यांना दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article