महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किंग आईस्क्रिमचा थाटात शुभारंभ

11:37 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आईस्क्रिम ग्राहकांच्या सेवेत : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

बेळगाव : व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा, निष्ठा, कष्ट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या आधारेच विजयकांत डेअरी अँड फुड प्रोडक्ट्स लिमिटेडने उद्योग क्षेत्रात स्वत:चा ब्रँड निर्माण केला आहे. आदित्य मिल्कने मागील 15 वर्षांत दर्जेदार उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवली आहेत. त्यामुळे बाजारात या ब्रँडने नाव कमावले आहे असे गौरवोद्गार महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढले आहे. विजयकांत डेअरी अँड फुड प्रोडक्ट्स लिमिटेड आदित्य मिल्कद्वारे किंग आयस्क्रिमचा शुक्रवारी शुभारंभ काकती येथील हॉटेल आयटीसीमध्ये पार पडला. यावेळी उद्घाटन करून बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार जगदीश शेट्टर, डॉ. विजय संकेश्वर, डॉ. आनंद संकेश्वर, निवेदिता सिदनाळ, दीपा सिदनाळ होते.

Advertisement

प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करून किंग आईस्क्रिमचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, आदित्य मिल्कने कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये यश मिळवले आहे. गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेमुळे बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि आईस्क्रिमसाठी देखील सरकार पाठबळ देण्यासाठी सकारात्मक विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विजय संकेश्वर यांनी देखील विजयकांत डेअरी अँड फुड प्रोडक्ट्स कार्याचा आढावा घेतला. शिवाय किंग आईस्क्रिम ग्राहकांच्या सेवेत दाखल झाल्याचे सांगितले. यावेळी संकेश्वर, सिदनाळ कुटुंबीय, नागरिक, वितरक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article