चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या बेळगाव शाखेचा थाटात शुभारंभ
बेळगाव : परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता व नावीन्य या पंचसूत्रीवर आधारित 1827 पासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या ‘चंदुकाका सराफ ज्वेल्स’ या सुवर्ण दालनाचा शुभारंभ बुधवार दि. 9 रोजी सकाळी थाटात करण्यात आला. आमदार राजू सेठ, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, उपमहापौर आनंद चव्हाण, डॉ. सावित्री व डॉ. रमेश दोड्डण्णावर यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल जीनदत्त शहा, संगीता अतुल शहा, सिद्धार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा, साहस बागी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दसरा, दिवाळी सणांचे औचित्य साधून खडेबाजार येथे हे भव्य दालन सुरू झाले आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे अनेक आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. दि. 11 ऑक्टोबरपर्यंत 15 हजारपासून पुढील दागिने खरेदीवर ग्राहकांना बक्षीस मिळण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये 6 लॅपटॉप, तीन स्कूटर, सहा मोबाईल यांचा समावेश आहे. तसेच रु. 3000 पासून योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार अभय पाटील यांनी या दालनामुळे बेळगावकरांना दागिने खरेदीसाठी उत्तम पर्याय मिळाला आहे. यामुळे चंदुकाका सराफ व बेळगावकर यांचे अतुट नाते निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी, पर्यटन व उद्योगाचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या तसेच ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा असलेल्या बेळगाव शहरात चंदुकाका ज्वेल्स या दालनाला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभेल, असेही ते म्हणाले. चंदुकाका सराफचे संचालक अतुल शहा यांनी अत्यंत समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली असणाऱ्या बेळगाव शहरामध्ये पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. बेळगावकर नागरिकांना उत्तमोत्तम दागिन्यांसाठी अभिनव पर्याय मिळणार आहे, असे सांगितले. नवता आणि परंपरा यांचा संगम येथे पाहायला मिळेल. बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धार्थ शहा यांनी केले.