Satara Municipal Elections | जिल्ह्यात शक्य आहे तिथे महायुती : मंत्री शिवेंद्रराजे
साताऱ्यात भाजपाचा फॉर्म्युला कार्यकर्त्याच्या मागणीनुसार स्थानिक पातळीवर निर्णय
सातारा : जेव्हा आघाड्या होत्या तेव्हा फॉर्म्युला होता. आता सगळे एकथ भाजपाचे आठोत. त्यामुळे भाजपाचाच फॉर्म्युला साताऱ्यात असून जिल्ह्यात जिथे जिथे शक्य आहे तेथे तेथे महायुती होईल, अन्यत्र आपापली ताकद आमजावली जाईल. कार्यकत्यांच्या मागणीनुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेतले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री . छ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी विधानसभा मतदार संघनिडाय निश्चित होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले ,भाजपाच्यावतीने सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाकरता अमोल मोहिते यांचा आणि इतर ५० जणांचे अर्ज दाखल करत आहोत. भाजपाने घेतलेल्या मुलाखतीची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवली होती. निर्णय द्यायला उशीर झाला. ४०० पेक्षा जास्त इच्छुक मुलाखतीला होते. सगळे ताकदीचे डोते. ही काय आयपीएल नाही ए टीम, बी टीम सिलेक्ट केली. ५० उमेदवारांतून निवडायचे होते. पक्षाने आणि सर्वांनी निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहरातील रस्ते कॉक्रीटीकरण करण्यावर भर दिला आहे. त्याकरता निधी लागतो तो आणला जात आहे . अनेक प्रकल्प होत आहेत.
अजिंक्यताऱ्याच्या दुरिझमसाठी १३२ कोटी आराखडधाला मंजुरी दिली आहे. माहुलीला सुद्धा निधी दिला आहे पाच वर्षात भाजपच्या माध्यमातून सुनियोजित विकासाचे नियोजन केले आहे. राजवाडा परिसरात पार्किंगची कोंडी फोडण्यासाठी जुना दवाखान्याच्या जागेवर पार्किंगतळ उभारण्यात येणार आहे. शाहू कला मंदिर येथे नवीन नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. निवडणुका संपल्यानंतर तो पाठवण्यात येणार आहे. बदलता सातारा विकासात्मक केला जाणार आहे. कास दुरिझम वाढत आहे. त्याकरता वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंगरोड प्रस्तावित केला आहे, असे त्यांनी सांगितले.
आघाडपावेळी फॉर्म्युला असायचा
लोकसभेला विश्वास दाखवला, विधानसभेला विश्वास दाखवला, आता या निवडणुकीत सातारच्या विकासासाठी विश्वास ठेवा, असे आवाहन करत ते म्हणाले, पूर्वी आघाडीत फॉर्म्युला होता. आता सगळे भाजपामधून लढतोय. त्यामुळे फॉर्म्युला वगैरे असे काही नाही. सगळे एकच आहेत, असे सांगत महायुतीतल्या एकीच्या प्रश्नावर ते म्हणाले, आम्हाला जिथे शक्य आहे तिथे युती होईल. पण जिथे शक्य नाही तेथे स्वबळावर लढवत आहोत. वाई, पाचगणी, म्हसवड, असे सगळीकडे वेगवेगळे चित्र आहे. कुठे कोणाला डावलले जात नाही मी काठी फॉर्म्युला घेवून आलो नाही. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी ती पार पाहतो आहे.
उदयनराजे असतील, मी असेन, इतर पदाधिकारी असतील असे सर्व एकत्र बसून निर्णय घेतले. प्रभागाला न्याय देवू शकतील, सर्व समावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. येथे एकच फॉर्म्युला भाजपाचच, सगळ्यांची नावे मुंबईला कळवली होती. वरुन हा निर्णय झाला असून नगराध्यक्ष भाजपाचा होणार आहे. कोणत्याही आघाडीचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी विधानसभा वाईज ठरणार आहे. कोरेगावचे महेश शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल. प्रियाताई आमच्या सहकारी आहेत, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.