महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत ‘ग्रामोदय अभियान’

06:30 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांचे ग्राम वास्तव्य : विकास आराखडा तयार करण्याचे उपराज्यपालांचे निर्देश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील 11 जिह्यांचे जिल्हाधिकारी (डीएम) ग्रामवास्तव्य करून गावांमधील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. ‘ग्रामोदय अभियाना’अंतर्गत ही विशेष मोहीम सुरू करण्यात येत असून रविवारपासून उपराज्यपालांच्या निर्देशांनुसार सर्व जिल्हाधिकारी विविध गावांमध्ये रवाना झाले आहेत. रविवारचा संपूर्ण दिवस आणि एका रात्रीचा मुक्काम आपल्याला नेमून दिलेल्या गावांमध्ये करून सदर अधिकारी या योजनेला चालना देणार आहेत.

एक दिवसाच्या मुक्कामादरम्यान सर्व जिल्हाधिकारी ग्रामस्थांशी संवाद साधून विकास कामाचा आराखडा तयार करतील. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. राज निवास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 11 जिल्ह्यांपैकी सध्या बापरोला (पश्चिम दिल्ली जिल्हा), ताटेसर ग्रामीण (उत्तर-पश्चिम दिल्ली जिल्हा), फतेहपूर बेरी (दक्षिण दिल्ली जिल्हा), चिल्ला सरोदा बांगर (पूर्व दिल्ली जिल्हा) आणि पल्ला (उत्तर जिल्हा) आदी जिल्ह्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

रविवार, 7 जानेवारीला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी आपापल्या जिह्यातील गावांमध्ये पोहोचले. त्यानंतर रात्रीही त्यांचा मुक्काम गावामध्येच असणार आहे. यादरम्यान ते गावातील लोकांशी ’संवाद’ सत्र आयोजित करतील आणि त्यांच्याशी चर्चा करून दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (डीडीए) योजनांची रूपरेषा तयार करतील. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यात सकाळच्या सत्रात सर्व जिल्हाधिकारी खेडे आणि परिसरातील लोकांशी चर्चा करतील. सायंकाळच्या 3 ते 6 या वेळेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मागील संवाद कार्यक्रमात दिलेल्या कामांची पाहणी करणार आहेत.

सायंकाळी पुन्हा ग्रामस्थांशी संवाद

संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत गावकऱ्यांसोबत पुन्हा चर्चा होईल. या संवादावेळ लोक आपल्या तक्रारी आणि अभिप्राय अधिकाऱ्यांशी शेअर करतील. रात्रभर गावात मुक्काम केल्यानंतर जिल्हाधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी 7-11 वाजता संवादाची दुसरी फेरी सुरू करतील. यामध्ये विकास योजनांचा तात्पुरता आराखडा बनवला जाणार असल्याचे राज निवास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली ग्रामोदय अभियानांतर्गत विकास योजनांसाठी डीडीएला 800 कोटी ऊपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे. उपराज्यपाल सक्सेना हे ‘डीडीए’चे अध्यक्षही आहेत. या महिन्याच्या सुऊवातीला 180 गावांच्या प्रतिनिधींसोबत ‘राज निवास पर संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर उपराज्यपालांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिह्यातील गावांमध्ये जाऊन एक रात्र घालवण्याचे निर्देश दिले आहेत.

अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर

एकीकडे गाव विकासासाठी दिल्ली प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल रविवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. रविवारी दुपारी दोघेही वडोदरा येथे पोहोचल्यानंतर आयोजित रोड शो मध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. त्यानंतर केजरीवाल वडोदराहून भरूचला पोहोचले. रॅलीनंतर त्यांनी तुऊंगात बंद असलेल्या आप आमदार चैतर वसावा यांचीही भेट घेतली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article