For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रा. पं. वर लवकरच महिला प्लंबर नियुक्ती

11:47 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रा  पं  वर लवकरच महिला प्लंबर नियुक्ती
Advertisement

प्रशिक्षणाला प्रारंभ : बेळगाव, अरभावी, चिकोडी येथे प्रशिक्षण केंद्रे : सरकारकडून 2.47 कोटी निधीची तरतूद

Advertisement

बेळगाव : कौशल्य विकास, उद्यमशिलता आणि जीवनोपाय खात्याकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन ग्रा. पं. पातळीवर महिला प्लंबर नियुक्तीच्या कामाला गती देण्यात आली आहे. लवकरच प्रत्येक ग्रा. पं. मध्ये महिला प्लंबर दिसणार असून दि. 19 ऑगस्टपासून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी सरकारकडून 2 कोटी 47 लाख 90 हजार निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात अरभावी, चिकोडी, बेळगाव या तीन ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. नल, जल, मित्र योजनेंतर्गत जलजीवन मिशन योजना राबविण्यात आलेल्या ग्रा. पं. च्या व्याप्तींमध्ये महिला प्लंबर नियुक्ती करण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि महिला जीवनोपाय खात्याच्या अंतर्गत महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ग्रा. पं. दोन महिला प्लंबर नियुक्त केले जाणार असून, यासाठी जि. पं. कडून संबंधित ग्राम. पं. ना यापूर्वीच सूचना करण्यात आली होती. मार्गसूचीनुसार महिला प्लंबरची निवड करून यादी देण्याची सूचना ग्राम. पं. ना देण्यात आली होती. जिल्ह्यातील 500 ग्राम. पं. मधून 1000 महिला प्लंबर नियुक्त करण्याचे नियोजन जि. पं. कडून करण्यात आले आहे.

महिला प्लंबरना 17 दिवसांचे प्रशिक्षण

Advertisement

नियुक्त करण्यात आलेल्या महिला प्लंबरना 17 दिवसांचे प्रशिक्षण संबंधित प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर 21 दिवसांचे प्रशिक्षण कामावर नियुक्त असताना दिले जाणार आहे. दि. 19 ऑगस्टपासून प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यामध्ये 50 महिला प्लंबरांची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे. मार्गसूचीतील शिक्षणाच्या नियमानुसार निवड करण्यात आली आहे.

वेतन देण्याबाबत अद्याप कोणतीच मार्गसूची नाही

ग्रा. पं. वर निवड झालेल्या महिला प्लंबरना प्रशिक्षण देण्यात येत आहे. नियुक्त झाल्यानंतर त्यांना वेतन देण्याबाबत अद्याप कोणतीच मार्गसूची जारी करण्यात आली नसल्याचे जि. पं. अधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी ग्रा. पं. च्या 15 व्या वित्त आयोगातून निधी 

प्लंबर म्हणून निवड झालेल्या महिलांच्या प्रशिक्षणासाठी 49,580 रुपये खर्च केला जाणार असून, प्रत्येक महिलेला 24,790 रुपये खर्च केला जाणार आहे. सदर निधी ग्रा. पं. च्या 15 व्या वित्त आयोगातून खर्च करावा लागणार आहे.

Advertisement
Tags :

.