कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ग्राम चिकित्सालय’ लवकरच झळकणार

06:40 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंचायत वेबसीरिज तुम्हाला पसंत पडली असेल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित आणखी एक वेबसीरिज येत असून याचे नाव ‘ग्राम चिकित्सालय’ आहे. याची निर्मिती टीव्हीएफने केली असून यात अमोल पराशर आणि विनय पाठक समवेत अनेक दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement

‘ग्राम चिकित्सालय’ या सीरिजचे पोस्टर जारी करण्यात आले असून ही सीरिज प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. या सीरिजची कहाणी वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन राहुल पांडे यांनी केले आहे. या सीरिजमध्ये शहरातील डॉक्टर प्रभातचे आयुष्य दाखविले जाणार असून तो दुर्गम गावात जवळपास बंद पडलेले सार्वजनिक आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करू इच्छित असतो, परंतु त्याला शासकीय व्यवस्थेच्या अडचणी, स्थानिकांचा संशय आणि छोट्या गावातील अनोख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

ही सीरिज 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘ग्राम चिकित्सालय’मध्ये अमोल पराशर, विनय पाठक यांच्यासह आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखीजा आणि गरिमा विक्रांत सिंह हे कलाकार दिसून येतील.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article