कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खैबर पख्तुनख्वामध्ये राज्यपाल राजवट?

06:27 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्र्यांनी इम्रान समर्थनार्थ आंदोलन केल्याने शरीफ सरकारची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

‘पीटीआय’शासित खैबर पख्तुनख्वाच्या मुख्यमंत्र्यांनी इम्रान खान यांच्या कुटुंबासह आणि समर्थकांसह अदियाला तुरुंगाबाहेर रात्रभर निदर्शने केल्यामुळे शाहबाज सरकार संतप्त झाले आहे. पाकिस्तान सरकार खैबर पख्तुनख्वामध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचा विचार करत आहे. राज्यपाल राजवट ही प्रशासकीय रचना राखण्यासाठी एक घटनात्मक तरतूद असून अगदी आवश्यक असल्यास ती लागू केली जाईल, असे संकेत मंत्र्यांनी दिले. राज्यपाल राजवट लागू करण्याचा अंतिम निर्णय राष्ट्रपती घेतील.

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री सुहेल आफ्रिदी यांनी मध्यवर्ती कारागृह रावळपिंडीत आदियाला कारागृहाबाहेर निदर्शने केल्यानंतर काही दिवसांनी सरकार राज्यपाल राजवट लागू करण्याचा विचार करत असल्याचे पाकिस्तानचे कनिष्ठ कायदा आणि न्याय मंत्री बॅरिस्टर अकील मलिक यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर एकत्रितपणे सर्व विरोधकांचे आवाज क्रूरपणे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते पीटीआय प्रमुख इम्रान खान अदियाला तुरुंगात असले तरी त्यांच्या प्रकृतीबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांचे कुटुंबीय आणि पक्षातील सदस्य इम्रान खान जिवंत असल्याचा पुरावा मागत आहेत. मात्र, अधिकारी त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती लपवत असल्याचा दावा इम्रान समर्थकांकडून केला जात आहे.

Advertisement
Next Article