For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यपालांनी नाकारला कन्नड सक्तीचा अध्यादेश

01:13 PM Jan 31, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
राज्यपालांनी नाकारला कन्नड सक्तीचा अध्यादेश
राज्यपाल थावरचंद गेहलोत
Advertisement

कर्नाटकातील राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यावसायिक साइन बोर्डवरील कन्नड भाषेचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने अध्यादेश नाकारला आहे. राज्यपालांनी अध्यादेश परत केल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवारी केला. “आम्ही कायदा केला आणि अध्यादेश मंजूर केला परंतु त्याला राज्यपाल आपली संमती देऊ शकले नाहीत. त्याऐवजी, राज्यपालांनी तो अध्यादेश कर्नाटकाच्या विधानसभेत मंजूर केले पाहिजे असे सांगून ते पुन्हा परत पाठवले. अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील महिन्यात सुरू होणार असून, राज्यपाल थावरचंद गेहलोत हे १२ फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. या विधिमंडळ अधिवेशनामुळे राज्यपालांनी अध्यादेश परत केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच राज्य भाषेला पुरेसे महत्त्व न दिल्याबद्दल बेंगळुरूमधील व्यवसायांना लक्ष्य करणाऱ्या आणि कन्नड समर्थक गटांच्या हिंसक निषेधाच्या प्रतिसादात मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रशासनाने अध्यादेशाचा पाठपुरावा करण्याचा आता निर्णय घेतलाआहे

Advertisement

Advertisement
Tags :

.