For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्र व राज्य सरकारांनी ईव्हीच्या प्रोत्साहनावर काम करावे

06:48 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्र व राज्य सरकारांनी ईव्हीच्या प्रोत्साहनावर काम करावे
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कारण या लहान उद्योगाचा विकासदर  सध्याच्या घडीला तरी चांगला नाही. यामुळे आगामी पाच ते सात वर्षांसाठी कमी करांच्या स्वरुपात मदत होणे आवश्यक असल्याचे किया इंडिया यांनी यावेळी म्हटले आहे.

किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विक्री व विपणन विभागाचे राष्ट्रीय प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात एकूण 90,996 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. ज्या मागील वर्षाच्या तुलनेत 91 टक्के अधिक राहिल्या आहेत. तथापि एकूण कार विक्रीत कारचा वाटा हा केवळ 2.3 टक्के होता. तर शेजारच्या चीनमध्ये ईव्हीची हिस्सेदारी ही सुमारे 25 टक्के होती. दक्षिण कोरियाच्या ऑटोमेकरने 2023 मध्ये भारतात 2,55,000 वाहनांची कोणतीही वाढ न करता विक्री केली होती.

Advertisement

एसयूव्ही मॉडेल्समध्ये सेल्टॉस आणि सोनेटच्या यशस्वी लाँचिंगमुळे काहीसे उत्साही वातावरण राहिले आहे. कंपनीला 2024 मध्ये पाच ते सात टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

 कर कपात आवश्यक

मारुती सुझुकी आणि टोयोटा सारख्या जपानी दिग्गज कंपन्या हायब्रीड वाहनांवर कर कपात करण्यावर जोर देत आहेत. तसा विचार भारतात व्हावा अशी मागणी  किया इंडियाने केली आहे.

Advertisement
Tags :

.