महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘जीएसटी’तून वाढली सरकारची कमाई

06:11 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जूनमध्ये 1.74 लाख कोटी रुपये संकलन : जून-2023च्या तुलनेत 8 टक्क्मयांनी वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने जूनमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून चांगली कमाई केली आहे. जूनमध्ये जीएसटीमधून 1.74 लाख कोटी ऊपयांचे करसंकलन प्राप्त झाले आहे. गेल्या वषीच्या जूनच्या तुलनेत हे प्रमाण 8 टक्क्मयांनी अधिक आहे. गेल्यावषी जूनमध्ये सरकारने जीएसटीमधून 1.61 लाख कोटी ऊपये जमा केले होते.

जून-2024 महिन्यात सीजीएसटी 39,586 कोटी ऊपये आणि एसजीएसटी 33,548 कोटी ऊपये आहे. मे 2024 मध्ये सरकारचे जीएसटी संकलन 1.73 लाख कोटी ऊपये होते. जे गेल्यावषी मे महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा विक्रमी 10 टक्के अधिक होते. गेल्यावषी मे महिन्यात हा आकडा 1.57 लाख कोटी ऊपये जमा झाला होता.

भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. यामुळे वापर आणि गुंतवणूक वाढली आहे. ई-कॉमर्समध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे जीएसटी संकलनही वाढत आहे. करचोरी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलल्यामुळे जीएसटी संकलनातही वाढ होताना दिसत आहे. याशिवाय सरकारने काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटी दर कमी केले आहेत. त्यामुळे त्यांची विक्री वाढली असून जीएसटी संकलनही वाढले आहे.

उच्च जीएसटी संकलनातून सरकारला अधिक महसूल मिळतो. याचा उपयोग शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि इतर सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. जास्त महसुलामुळे सरकारची आर्थिक तूट कमी होते. यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते. चांगल्या जीएसटी संकलनामागे अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये आर्थिक सुधारणा, ई-कॉमर्समध्ये वाढ, करचुकवेगिरीवर कारवाई, कडक उपाययोजना यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article