Sangli News : सरकारने अतिवृष्टीसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत करावी : आ. डॉ. विश्वजीत कदम
आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी भुवनेश्वरी देवीचे सपत्नीक घेतले दर्शन
भिलवडी : राज्यातील मराठवाडयातील भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रचंड प्रमाणात पाण्याने शेती खरडून गेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना सरकारने सरसकट अतिवृष्टीसाठी हेक्टरी ५० हजाराची मदत करावी, असे मत माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. ते भिलवडी येथील भुवनेश्वरवाडी येथील भुवनेश्वरी देवीच्या दर्शनासाठी सपत्नीक आले होते.
ते म्हणाले जिल्हा काँग्रेसच्या वतीने अतिवृष्ठी भागातील उस्मानाबाद लातुर, बीड, या भागात दहा ट्रक जीवनावश्यक वस्तु पाठविल्या आहेत. तर भारती विद्यापीठामार्फत सहा ट्रक जीवनावश्यक वस्तु पाठविल्या आहेत. यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी भुवनेश्वरी देवीचे सपत्नीक दर्शन घेतले.
माजी सरपंच शहाजी गुरव यांनी आ. कदम यांचा सत्कार केला. तर सरपंच शबानामुल्ला व वैशाली गुरव यांनी स्वप्नाली कदम यांचा सत्कार केला. या प्रसंगी माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, प्रतीक पाटील, विलास पाटील संभाजी सुर्यवंशी बी. डी. पाटील' बाळासो मोरे, पांडुरंग टकले, मूसा शेख, उपस्थित होते.
डोक्यात विचार आणू नका
भुवनेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आ. डॉ. विश्वजीत कदम येत असताना काँग्रेसचे संभाजी नाना सुर्यवंशी यांनी कदम यांच्या हातात हात देऊन वेगळ विचार डोक्यात आणू नका असे वक्तव्य केल्याने आ. कदम यांनी डोक्यात वेगळा विचार काही नाही असे उत्तर दिले .
मात्र भिलवडी परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. संभाजी नाना सुर्यवंशी गेली काही दिवस काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसत नाहीत यामुळे त्यांच्याबद्दल कदम यांच्याकडे चुकीची माहिती गेली असावी यामुळे सुर्यवंशी यांनी डोक्यात वेगळा विचार आणू नका असे वक्तव्य कदम यांच्याकडे केले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.