महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सरकारने सौरउर्जेला प्राधान्य द्यावे

12:12 PM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसची मागणी, तमनारबाबत टीका

Advertisement

पणजी : तमनार प्रकल्प पूर्ण होणार नाही, याची जाणीव वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना झाल्याचे दिसून येते. त्यांनी आता वेस्टर्न ग्रीडमधून वीज मिळवण्यावर भर द्यावा आणि राज्यात सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यावरही काम करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माध्यम प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. पणजी येथे काँग्रेस भवनात मांद्रेचे गट अध्यक्ष नारायण रेडकर तसेच साळगावचे गट अध्यक्ष अतुल नाईक यांच्या सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, अमरनाथ पणजीकर यांनी, इंडिया आघाडी सरकार जूनमध्ये सत्तेवर आल्यानंतर तमनार प्रकल्पाचा समावेश असलेल्या तीन रेखीय प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होईल असे सांगितले. राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिलेल्या माहितीवरून, गोव्यात केवळ 46.97 मेगा युनिट्स सौरउर्जा तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री ढवळीकर हे मंगळवारच्या पत्रकार परिषदेत 55 सरकारी कर्मचारी, 7 नागरिक आणि 17 जनावरांच्या विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूंवर सोयीस्करपणे काहीही बोलले नाही. वीज बिल थकबाकीदार असलेल्या औद्योगिक, व्यावसायिक आणि सरकारी ग्राहकांकडून विद्युत खाते 1400 कोटी कधी वसूल करणार याचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी पणजीकर यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article