कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Vishwajeet Kadam: शासनाच्या धोरणामुळे सूतगिरण्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

05:52 PM Sep 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

                                  कृष्णा-वेरळा सूतगिरणी पंचवीस वर्षे चालू

Advertisement

पलूस:  शासनाच्या धोरणामुळे सूतगिरण्यांना प्रचंड अचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजेच्या वाढत्या दरामुळे अर्थिक बोजा सूतगिरण्यावर वाढत असताना कृष्णावेरळा सूतगिरणीने ९९ कोटी ३० लाखाची सूतविक्री करून तीन कोटी २३ लाख इतका नफा मिळवून राज्याबरोबर देशात व परदेशात नवलौकिक प्राप्त केला आहे, असे प्रतिपादन आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस येथे केले.

कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहाकारी सूत गिरणीच्या चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर महेंद्र लाड, सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब गोतपागर, व्हा. चेअरमन वैभव गायकवाड, जनरल मॅनेजर अरूण दिवटे, पांडूरंग सूर्यवंशी, जे.के.पाटील, जे. के. बापू जाधव, बाळासाहेब पवार, गणपतराव सावंत, घनशाम सूर्यवंशी, सतीश पाटील, सुनील सावंत, शरद शिंदे, प्रल्हाद शितापे, गजानन सूर्यवंशी, सर्जेराव पवार, शिवाजीराजे जाधव यांच्यासह संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

आ. कदम म्हणाले, पलूस तालुक्यातील तरूणाच्या रोजगारांचा प्रश्न सुटावा, या उद्देशाने स्व.डॉ. पतंगराव कदम यांनी कृष्णा-वेरळा सूतगिरणीची उभारणी केली. महाराष्ट्रामध्ये सुमारे १२५ सहकारी सूतगिरण्या कार्यरत आहेत. त्यापैकी आठरा ते वीस सूतगिरण्या मागासवर्गीय आहेत.

महाराष्ट्रातील अनेक सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. अडचणीचा काळ असून देखील कृष्णा-वेरळा सूतगिरणी पंचवीस वर्षे चांगल्या पध्दतीने चालू आहे, याचा अभिमान आहे. यापुढील उपना मया, वार्षिक सर्वसाधारण सभा काळात वीजेच्या वाढीव दराबाबत काही करता येईल का याबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.

आजरोजी २५७२८ चात्या सुरू करून प्रकल्प पूर्ण क्षमतेने उत्पादनाखाली आला आहे. सध्या ३९५ कर्मचारी काम करीत आहेत. वस्त्रोद्योगाचा विचार करता या व्यवसायात अद्यापी स्थैर्य प्राप्त झालेले नाही. जागतिक तसेच देशांतर्गत मंदी, महागाई,पस्वातीसवी ढीव कापूसाचा बाजार भाव व त्यामानाने सुतास मागणी नसल्याने सूत दरात घट होत असून हा व्यवसाय अडचणीतून मार्ग काढत आहे.

अहवाल सालात महाराष्ट्र शासनाने भाग भांडवलापोटी व समाजकल्याण विभागाकडील कर्जापोटी परतफेड करणाऱ्या काही मोजक्या सूतगिरणीमध्ये आपली सूतगिरणी अव्वल ठरली आहे. विषय वाचन अशोक पाटील यांनी केले. अहवाल वाचन जनरल मॅनेजर अरूण दिवटे यांनी केले. सभेस बी.डी. पाटील, संपत पाटील, प्रल्हाद गडदे, गिरीष गोंदील, सुधीर जाधव, विश्वास पाटील, विजय आरबुणे, जयकर पाटील, डी.ई. पवार, व्हा. चेअरमन महेश पवार उपस्थित होते.

गावाच्या नावाने होणार वृक्षारोपण
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, दि. ५ सप्टेंबर रोजी वांगी येथील स्व. डॉ. पतंगराव कदम स्मृतीस्थळास एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने स्मृतिस्थळावर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या नावाने एक झाड लावण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातून माती घेवून त्या ठिकाणी उपस्थित होते

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaelectricityfacing financial burdengovernment policiesimmense hardshipsmillsspinning mills
Next Article