For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारवाडला पाणी सोडण्यासाठी सरकारी निकष आवश्यक

11:35 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
धारवाडला पाणी सोडण्यासाठी सरकारी निकष आवश्यक
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी : जि. पं. सभागृहात सिंचन विभागाची बैठक

Advertisement

बेळगाव : धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी सोडण्यासाठी सरकारी निकष आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. काम सुरू होण्यापूर्वी आम्ही कळविले होते की हिडकल जलाशयातून पाणी सोडण्यात येणार नाही. पण अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर समजले की सरकारने पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी हिडकलमधून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. धारवाड औद्योगित क्षेत्राला 0.58 टीएमसी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केआयडीबीची निविदा काढल्यानंतर कामे सुरू झाली आहेत. पण भविष्यात पाणी सोडताना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. जि. पं. सभागृहात आयोजित सिंचन विभागाच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रायबागचे आमदार डी. एम. ऐहोळे उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प सुरू असून कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात अनेक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असून लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. जिल्हा विभाजनासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी सहमती दर्शविली असून सरकारकडून योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल. हिडकल जलाशय पूर्णपणे भरले असून बुधवारपासून 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे.

Advertisement

जिल्हा सिंचन विभाग अंतर्गत सुमारे 712 अभियंता पदे रिक्त असून सर्वाधिक ग्रुप सी 258 यानंतर साहाय्यक अभियंता 159 पदे रिक्त आहेत. सिंचन विभागाकडून 2024-25 सालात जिल्ह्यात 627 कोटी रुपयांची सिंचन कामे करण्यात आली आहेत. घटप्रभा, मार्कंडेय, दूधगंगा व बळ्ळारी नाला प्रवाह सिंचना योजना राबविण्यात येत असून यासाठी 5 हजार 246 कोटी रुपये निधीतून ही कामे करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत सर्व कामे पूर्ण झाली असून केवळ खासदार व आमदारांनी मागणी केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. बळ्ळारी नाल्यासाठी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविण्यात आल्याची माहिती सिंचन अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 31 सिंचन प्रकल्प सुरू असून यासाठी 31 मार्च 2025 अखेर 9488 कोटी संचित खर्च, 5916 कोटी थकबाकी असून 2025-26 सालासाठी आणखी 59 कोटी निधीची आवश्यकता भासणार आहे. सध्या 7 उपसा सिंचन प्रकल्प सुरू असून केंपवाड, चचडी, मुरगोड, रामेश्वर योजना, हिप्परगी, अडवीसिद्धेश्वर आणि शंकरलिंग उपसा सिंचन योजना सुरू आहे. यासाठी 3596 कोटी रुपये संचित खर्च, 440 कोटी थकबाकी आहे. जिल्ह्यात 6 नवीन उपसा सिंचन प्रकल्प सुरू असून 1601 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. 283 कोटी संचित खर्च, 2672 थकबाकी आहे.

जिल्ह्यात 166 तलाव भरण्यात येणार आहेत. रायबाग मतदारसंघातील 39, कुडची मतदारसंघातील 19, कित्तूर 64, कागवाड मतदारसंघातील 23, उळ्ळगड्डी-खानापूर, अरभावी येथे 20 तलाव भरण्यात येणार आहेत. यासाठी 672 कंत्राट देण्यात आले असून 297 संचित खर्च, 375 थकबाकी आहे. इतर पाणीपुरवठा योजना सुरू असून जुने डिग्गेवाडी येथे बॅरेज, कल्लोळ येथे बॅरेज, हिप्परगी तळभागात ब्रिज यासह गोकाक, हिडकल डॅम येथेही योजना सुरू आहेत. यमकनमर्डी, हुक्केरी, दक्षिण, कित्तूर, गोकाक, बैलहोंगल, कुडची, निपाणी, रायबाग, चिकोडी मतदारसंघात विविध सिंचन, कालवा निर्माण व इतर योजनांसाठी प्रस्ताव आले आहेत. यासाठी विभागीय स्तरावर पावले उचलण्यात येत असून याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच सध्या सुरू असलेली कामे, प्रलंबित कामे, नवीन कामांना गती देऊन नागरिकांना अनुकूल करून देण्याची सूचना पालकमंत्री जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

2018 मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात सुरू झालेली तलाव भरण्याचा प्रकल्प 99 टक्के पूर्ण झाला आहे. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात सुरू झालेली महत्त्वपूर्ण कामे पुर्णत्वास येत आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हुदली उड्डाणपूल, जिल्हाधिकारी कार्यालय यासह अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.

धारवाडला हिडकलमधून केवळ 1 टीएमसी पाणी

धारवाड औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातून पाणी देण्याच्या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. मात्र हिडकलमधून टप्प्याटप्प्याने केवळ 1 टीएमसी पाणीच देण्यात येणार आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाला विचारात न घेता सरकार स्तरावरून पाणी नेण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त जरी खरे असले तरी धारवाडला केवळ पहिल्या टप्प्यात अर्धा व दुसऱ्या टप्प्यात अर्धा टीमएमसी पाणी देण्यात येणार आहे. पण पाणी सोडताना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हणाले.

Advertisement
Tags :

.