For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षक मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील

10:30 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिक्षक मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळींचे प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : शिक्षक मतदारसंघांच्या विकासासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार प्रतिसाद देत आहे. यादृष्टीने सरकारी शाळा आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सरकार यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. येथील महावीर भवन येथे रविवारी कर्नाटक राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक कार्यशाळा आणि महासभेचे उद्घाटन करून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजाच्या विकासामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे. यामुळे शिक्षकांच्या समस्या निकालात काढण्यासाठी सरकारस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सरकारी शाळांच्या विकासासाठी शक्य तितके प्रयत्न करण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आवश्यक ती मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले, शिक्षकांची सेवा करावी या उद्देशानेच या मतदारसंघातून निवडून आलो आहे. शिक्षकांनी आपल्याला निवडून देऊन सहकार्य केले आहे. लवकरात लवकर शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे पहिल्या टप्प्यातील चर्चा केली असल्याचे हुक्केरी यांनी सांगितले. यावेळी एस. डी. गाडी, उमादेवी हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.