महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमानांमधील धमक्यांमुळे सरकार अॅक्शन मोडमध्ये

06:47 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोशल मीडिया साईट्सना गाईडलाईन्स : फेक मेसेज हटवण्याचे निर्देश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

गेल्या काही दिवसात बॉम्बस्फोट घडवण्यासंबंधी प्राप्त होत असलेल्या खोट्या धमक्मयांवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. आयटी मंत्रालयाने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला गाईडलाईन्स (सूचना) जारी केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात असलेल्या अफवा रोखण्याची तसदी संबंधित साईट्नी घेतली पाहिजे, असे सक्त निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. खोटी माहिती त्वरित काढून टाकली नाही तर सोशल मीडिया साईट्सना आयटी कायद्यांतर्गत प्राप्त असलेले अधिकार कमी करण्याचा विचार केला जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

भारतीय विमानांना सातत्याने मिळणाऱ्या बनावट बॉम्बच्या धमक्मयांबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (आयटी मंत्रालय) सूचना जारी केल्या आहेत.  यामध्ये सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बनावट बॉम्बचे धोक्मयाचे संदेश काढून त्याचा प्रसार थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने सोशल मीडिया साइट्स ‘एक्स’ आणि ‘मेटा’ यांना असे संदेश त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या खोट्या धमक्मयांमुळे विमानसेवा प्रभावित होत आहे. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. बनावट उ•ाणाच्या धमक्मयांमुळे आर्थिक नुकसान होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘फॉरवर्ड/री-शेअर/री-पोस्ट/री-ट्विट’ या पर्यायामुळे अशा बनावट बॉम्बच्या धमक्मयांना प्रोत्साहन दिले जाते, असेही आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. यापूर्वी सरकारने चालू आठवड्याच्या सुऊवातीला मेटा आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रमुखांशी ऑनलाईन बैठक घेत काही सूचनाही केल्या होत्या.

सरकारने पुढे म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अशा चुकीच्या माहिती त्वरित दूर करणे हे सोशल मीडिया कंपन्यांचे कर्तव्य आहे. आयटी नियम, 2021 चा हवाला देत सरकारने म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपन्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर कोणीही बेकायदेशीर किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी करणार नाही. असे झाल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी लागेल.

आणखी 33 विमानांना धमक्या

शनिवारी पुन्हा एकदा इंडियन एअरलाइन्सच्या 33 विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या. एकंदर गेल्या 13 दिवसांत 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या आहेत. मात्र, तपासात ह्या सर्व धमक्या फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article