महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दुष्काळ निवारण्यात सरकार अपयशी; भाजप नेत्यांचा आरोप

10:11 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप नेत्यांचा आरोप : राज्य सरकारविरुद्ध आंदोलन

Advertisement

बेंगळूर : केंद्र सरकारविरोधात राज्य काँग्रेस सरकारने दिल्लीत आंदोलन हाती घेतलेले असतानाच राज्य भाजप नेत्यांनीही राज्य सरकारविरोधात बेंगळूरमध्ये आंदोलन केले. राज्यातील काँग्रेस सरकार दुष्काळ निवारण कामे राबविण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची सरकारने दखल घेतलेली नाही. तातडीने दुष्काळ निवारण कामे हाती घ्यावीत, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदारांनी बेंगळूरमधील विधानसौध आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन छेडले. आंदोलनात माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषद विरोधी नेते कोटा श्रीनिवास पुजारी व इतर आमदार सहभागी झाले. त्यांनी काँग्रेस सरकारच्या अपयशाविरोधात भित्तीपत्रके हाती धरून धिक्काराच्या घोषणा दिल्या. भाजप नेत्यांनी घोषणाबाजी करत विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.

Advertisement

केंद्रावर निराधार आरोप : विजयेंद्र

राज्यातील काँग्रेस सरकार शेतकरीविरोधी आहे. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना मदतनिधी दिलेला नाही. दूध उत्पादकांना साहाय्यधन देण्यात आलेले नाही. अनुसूचित जाती-जमातीसाठीचे राखीव अनुदान इतरत्र वळविण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारकडूनच जनतेवर अन्याय झाला आहे. मात्र, त्यांच्याकडून केंद्र सरकारवर निराधार आरोप केले जात आहेत. दिल्ली चलो अभियान हाती घेतलेल्या काँग्रेसला मतदार लोकसभा निवडणुकीत घरी पाठवून योग्य धडा शिकवतील, अशी टीका बी. वाय. विजयेंद्र यांनी केली.

काँग्रेसचे नाटक : बोम्माई

राज्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर नाटक केलेले दुसरे सरकार नाही. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी आपली तत्त्वे धाब्यावर बसविली आहेत. मुख्यमंत्रिपद शाबूत राहण्यासाठी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन केले आहे, अशी खोचक टिप्पणी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article