For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सत्ता ब’ साठी शासनाची डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

05:10 PM Mar 07, 2025 IST | Radhika Patil
‘सत्ता ब’ साठी शासनाची डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Advertisement

सातारा : 

Advertisement

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी म्हणजे सत्ता प्रकार ब रद्द करण्यासाठी शासनाने 4 मार्च 2025 रोजी अंतिम निर्णय घेऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष शंकरराव माळवदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

माळवदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, यापूर्वी सहकारी गृहनिर्माण संस्थांना ब वर्ग हटवण्यासाठी पंधरा टक्के रक्कम प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे भरावे लागत होती, ती आता प्रचलित दरानुसार दहा टक्केच भरावी लागणार आहे. तसेच रहिवासी प्रयोजनासाठी कब्जा हक्काने वैयक्तिक धारण केलेल्या जमिनी यास पंधरा टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच रहिवासी प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनींना आता वार्षिक दर विवरण प्रतलातील दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या 25 टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच वाणिज्य अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनीस वार्षिक दर विवरण पत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या 50 टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर मात्र 60 टक्के ते 75 टक्केपर्यंत रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व बाधित मिळकतदारांनी लवकरात लवकर सर्व कागदपत्रांसहित आपले अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सादर करावेत. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रशासकीय दिरंगाई टाळण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी तसेच यापूर्वी ज्या मिळकत धारकांनी आपणाकडे अर्ज केलेले आहेत. त्यासंबंधी सुद्धा त्वरित निर्णय घेण्याचे आदेश पारित करावे असे निवेदन दिले आहे.

Advertisement

नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधावा त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. तसेच ही योजना कायमस्वरूपी असावी याकरिता सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. परंतु यावर विसंबून न राहता बाधित मिळकतदाराने मुदत संपण्यापूर्वी अर्ज करणे जरुरी आहे, असे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.