कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

10:42 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायतीने जिह्याच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या बेळगाव तालुका कर्मचाऱ्यांचे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी अभिनंदन केले. दररोजच्या ताणतणावात असूनही तुम्ही क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे आणि यश मिळवले आहे. खेळ हे जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत. दररोज योगा आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला बेळगाव तालुका चॅम्पियन आहे ही आनंदाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी युवराज कदम, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article