शासनाने गाय दूध प्रोत्साहनपर अनुदान गोकुळ संघामार्फत उत्पादकाला द्यावे- राजेंद्र सुर्यवंशी
कसबा बीड/ प्रतिनिधी
नुकतेच राज्य शासनाच्या दुग्धविकास खात्याने येत्या दोन महिन्यासाठी सहकारी संस्थात संकलन होणाऱ्या गाय दुधास प्रती लिटर पाच रुपये प्रोत्साहनपर अनुदान डीबीटी माध्यमाद्वारे देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या डीबीटी ( डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर ) माध्यमा मध्ये अनेक जाचक अटी आहेत. त्यामुळे हे प्रोत्साहनपर अनुदान संघाच्या खात्यावर जमा करावे आणि संस्थांनी दूध बिलातून ते उत्पादकांना अदा करा अशी मागणी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी.
कसबा बीड ( ता. करवीर) येथील कल्लेश्वर दूध संस्थेत प्रोत्साहनपर अनुदानाच्या डीबीटी माध्यामवर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या सभासदाच्या बैठकीत ते बोलत होते.
सुर्यवंशी म्हणाले की. गाय दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ केवळ सहकारी दूध संस्थांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना मिळणार आहे. दूध संघांनी ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ अशा प्रतिच्या दुधासाठी प्रती लिटर २९ रुपये दर देणे केले आहे. तसेच संस्थांनी दूध बिले उत्पादकांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करणे, उत्पादकाचे हे खाते आधार कार्ड आणि पशुधना आधार कार्डशी लिंक असणे आणि त्याची पडताळणी होणेही बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक संस्थाना अडचणी येणार आहेत. गोकुळ सारख्या संघाकडे ३० टक्के संस्थाकडे या सुविधा आहे. उर्वरित ७० टक्के संस्थाना ही यंत्रणा उभी करावी लागणार आहे. शिवाय या संस्थांच्या लाखो उत्पादकांना बँकेत खाते काढावे लागणार आहे.
गायीची एन.डी.डी. बी. च्या इनाफ किवा केंद्र सरकारच्या भारत पशुधन अॅपवर नोंदणी आणि पडताळणी असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणेत झगडत बसण्या ऐवजी हे अनुदान संघाच्या खात्यावर जमा करावे आणि संस्थांनी दूध बिलातून ते उत्पादकांना अदा करावे, हे फायद्याचे राहणार आहे. गोकुळ आणि वारणा संघांकडून ८ लाखांच्या आसपास लिटर गाय दूध संकलित केले जाते. अटीतील निर्धारित २९ रुपये दराऐवजी ३० रुपयेपेक्षा जास्त दर या दोन्ही संघांकडून गाय दूध उत्पादकांना दिला जातो, त्यामुळे शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानाची प्रती लिटर पाच यावेळी कल्लेश्वर दूध संस्था चेअरमन शामराव सुर्यवंशी, बाबुराव हिलगे, कृष्णात हळदकर, माजी सरपंच दिनकर गावडे, प्रकाश सुर्यवंशी, सचिव नामदेव माने व सभासद आदी उपस्थित होते.