महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पालिका कायद्यांच्या चौकटीत राहूनच कारभार

12:11 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव पालिका मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांची नगराध्यक्षांच्या टीकेवर प्रतिक्रिया

Advertisement

मडगाव : पालिका कायद्यांच्या चौकटीत राहूनच आपण पालिकेचा प्रशासकीय गाडा हाताळत असल्याची प्रतिक्रिया मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मुख्याधिकारी शंखवाळकर हे प्रशासकीय कामकाज हाताळण्यात कमी पडत असून राजकारण करत असल्याची टीका केली होती. यावर मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी वरीलप्रमाणे उद्गार काढले. सोनसडा येथील ट्रकांमधून कचऱ्याचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहून आल्याने मंगळवारी रात्री रस्ता निसरडा बनून चार दुचाकीस्वार घसरून पडून जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कारभारावर स्थानिकांकडून तसेच कुडतरीच्या आमदारांकडून टीका झाली होती. बुधवारी सकाळी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मुख्याधिकारी शंखवाळकर यांना पाहणीसाठी सोनसड्यावर बोलवून घेतले होते. यावेळी आपणास याबाबत कल्पना दिली गेली नसल्याने नगराध्यक्ष शिरोडकर यांनी संताप व्यक्त केला होता व मुख्याधिकारी राजकारण करत असल्याची टीका केली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला आपले काम व कर्तव्याची जाणीव असून त्यानुसार पारदर्शकरीत्या आपण काम करत आहे. ट्रकांमधून सांडपाणी वाहून येऊन जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता. आपण त्याची जबाबदारी स्वीकारतो. भविष्यात अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना केलेले वक्तव्य आपण पाहिले आहे. त्यावर खास भाष्य करणे आवश्यक असल्याचे आपणास वाटत नाही, असे मुख्याधिकारी म्हणाले.

Advertisement

नगराध्यक्षांच्या विधानावर पालिकेत उलटसुलट चर्चा

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मुख्याधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे काम न केल्यास त्यांच्या कक्षाला आपण टाळे ठोकणार व आपल्या कक्षात त्यांना बसवून काम करायला लावणार असे विधान केल्याने पालिका आवारात उलटसुलट चर्चा सुरू होती. काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांचे हे विधान आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. मुख्याधिकारी हे प्रथम श्रेणीतील अधिकारी असून त्यांच्याबद्दल बोलताना नगराध्यक्षांनी संयम बाळगायला हवा होता. त्यांच्या कक्षाला टाळे ठोकल्यास ते पालिकेत का उपस्थिती लावतील. अशाने नगराध्यक्षच पालिकेचा कारभार ठप्प होण्यास हातभार लावतील, असे एका माजी नगराध्यक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article