गॉफची पेगुलावर मात, स्वायटेक विजयी
वृत्तसंस्था/ रोम
2024 च्या टेनिस हंगामातील सुरु असलेल्या महिलांच्या डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धेत झालेल्या एका सामन्यात अमेरिकेच्या टॉप सिडेड कोको गॉफने आपल्याच देशाच्या जेसिका पेगुलाचा पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात द्वितीय मानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने परतीच्या सामन्यात बार्बोरा क्रेसिकोव्हावर मात केली.
अमेरिकेच्या गॉफने जेसिका पेगुलाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात स्वायटेकने क्रेसिकोव्हाचा 4-6, 7-5, 6-2 अशी मात केली. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर स्वायटेकचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात स्वायटेकने पहिला सेट गमाविल्यानंतर दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. मात्र शेवटच्या सेटमध्ये क्रेसिकोव्हाला आपली सर्व्हिस राखता न आल्याने तिला पराभवाला सामोरे जावे लागले. स्वायटेकने चालू वर्षीच्या टेनिस हंगामात केवळ 29 सामने खेळले असून त्यापैकी विम्बल्डन स्पर्धेतील 7 सामन्यांचा समावेश आहे. स्वायटेकला अलिकडच्या कालावधीत दुखापतीच्या समस्येला वारंवार तोंड द्यावे लागले.