फ्लॅटपेक्षा कमी किमतीत मिळाले बेट
प्रेयसीसोबत करतोय वास्तव्य
शहरांच्या गोंगाटापासून दूर जात निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहण्याची इच्छा अनेकांना असते. एका इसमाने स्वत:ची इच्छा पूर्ण केली आहे. हा इसम अमेरिकन-फिशिन वंशाचा आहे. या इसमाने एका 2बीएचके फ्लॅटपेक्षाही कमी किमीतत एक बेट खरेदी केले आणि तेथे तो स्वत:च्या प्रेयसीसोबत राहत आहे. तेथे त्याने निर्माण केलेले घर पाहून लोक दंग होत आहेत.
24 वर्षीय ऑलिव्हर रसेल अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहत होता. तर 2020 मध्ये तो कोलोराडोच्या फोर्ट कॉलिन्स भागात स्थायिक झाला होता. उन्हाळ्याच्या सुटीत तो फिनलंड येथे जायचा, तेथे त्याचे अनेक नातेवाईक राहतात. अशा स्थितीत त्याने हेलसिंकी येथे जाऊन शिक्षण घेण्याचा विचार केला. ऑगस्ट 2022 मध्ये त्याने स्वत:च्या या स्वप्नाची पूर्तताही केली.
फिनलंडमध्ये ऑलिवरची भेट 20 वर्षीय हेलेनासोबत झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी प्रॉपर्टी वेबसाइटवर फिनलंडनमधील एक बेट पाहिले जे विकले जाणार होते. हे बेट केवळ 31 हजार डॉलर्सचे (26 लाख रुपये) होते. महानगरांमध्ये 2 बीएचके फ्लॅट देखील इतक्या किमतीत मिळत नाही. ऑलिवरने अडीच एकराचे हे बेट मार्च महिन्यात खरेदी केले.
या बेटावर त्याने तंबू ठोकला, एक आउटहाउस तयार केले, जे त्याने समर कॅबिन आणि सौनामध्ये रुपांतरित केले. फिनलंडमध्ये समर कॉटेज लाइफ येथील संस्कृतीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. बेटावर अत्यंत शांतता असल्याने हे जोडपे उन्हाळ्यात येथे स्वत:चा वेळ घालविते आणि तसेच स्वत:च्या नातेवाईकांची भेट घेण्यास जात असते. त्यांनी बेटावर लाकडी बाथरुम आणि अन्य सुविधांची व्यवस्था केली आहे.