कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोपालचे अर्धशतक तसेच गोलंदाजीत चार बळी

06:47 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात खेळाच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटकाचा पहिला डाव 313 धावांत आटोपल्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या डावात 6 बाद 200 धावा जमविल्या आहेत. या सामन्यात कर्नाटकाची स्थिती महाराष्ट्राच्या तुलनेत निश्चितच दर्जेदार म्हणावी लागेल.

Advertisement

कर्नाटकाने 5 बाद 257 या धावसंख्येवरुन रविवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 111 षटकात 313 धावांत आटोपला. कर्नाटकाच्या पहिल्या डावात शेवटचे 5 फलंदाज केवळ 56 धावांत तंबूत परतले. कर्णधार मयांक अगरवालने 2 षटकार आणि 7 चौकारांसह 80, अनिशने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34, समरनने 84 चेंडूत 7 चौकारांसह 54, अभिनव मनोहरने 129 धावांत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 47 तसेच श्रेयस गोपालने 162 चेंडूत 9 चौकारांसह 71 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे मुकेश चौधरीने 3, ओसवालने 2 तर सक्सेनाने 94 धावांत 4 व घोषने 1 बळी मिळविला.

त्यानंतर कर्नाटकाच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 66 षटकात 6 बाद 200 धावा जमल्या. दरम्यान सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉने 9 चौकारांसह 71 तर अर्शिन कुलकर्णीने 5 चौकारांसह 34, सचिन दासने 2 चौकारांसह 21, नवलेने 3 चौकारांसह 26 धावा केल्या. सक्सेना 4 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहे. कर्नाटकाच्या श्रेयस गोपालने 46 धावांत 4 तर मोहसिन खानने 56 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - कर्नाटक प. डाव सर्वबाद 313 (अगरवाल 80, समरन 54, श्रेयस गोपाल 71, अभिनव मनोहर 47, अनिश 34, अवांतर 13, महेश चौधरी 3-66, सक्सेना 4-94, ओसवाल 2-53, घोष 1-4), महाराष्ट्र प. डाव 66 षटकात 6 बाद 200 (पृथ्वी शॉ 71, कुलकर्णी 34, दास 21, नवले 26, सक्सेना खेळत आहे 34, श्रेयस गोपाल 4-64, मोहसिन खान 2-56).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article