For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गोपालपूर बंदर अदानी समूहाच्या ताफ्यात

06:31 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोपालपूर बंदर अदानी समूहाच्या ताफ्यात

कटक :

Advertisement

ओडिसातील गोपालपुर हे बंदर अदानी समूहाने नुकतेच खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. अदानी समूहाने गोपालपूर बंदराची जवळपास 95 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. शापुरजी पालनजी समूहाच्या अधीन असलेल्या गोपालपूर बंदरावर आता अदानी  पोर्टस् अँड एसइझेड लिमिटेड यांचा ताबा राहणार आहे. शहापूरजी पालनजी सोबत सदरच्या बंदरासाठी कंपनीने 3350 कोटी रुपयांचा व्यवहार केला असल्याचेही समजते. ओडिसामध्ये बांधकामाच्या टप्प्यात असणारे गोपालपूर बंदर शहापूरजी पालनजी समूहाने 2017 मध्ये खरेदी केले होते. 20 एमटीपीए (दशलक्ष टन वार्षिक)इतकी मालवाहतूक क्षमता सांभाळणारे हे बंदर आहे. शहापूरजी पालनजी समूहाने गेल्या काही महिन्यांमध्ये आपले दुसरे बंदर विक्री करून पैशाची उभारणी केली आहे.

कर्जफेडीसाठी विक्री

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार शहापूरजी पालनजी समूहावर जवळपास 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे असे समजते. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठीच कंपनी निधी उभारणीसाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे....दिग्गज उद्योगपती नवीन जिंदाल यांनी अलीकडेच या पक्षामध्ये प्रवेश केला आह.s भारतीय जनता पक्ष  फरारीचा चालक कार्लोस सेंज हा ऑस्ट्रेलियन ग्रां प्री फॉर्म्युला वन स्पर्धेचा विजेता ठरला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.